मोदी उझबेकिस्तानात

By Admin | Updated: July 6, 2015 23:20 IST2015-07-06T23:20:16+5:302015-07-06T23:20:16+5:30

पंतप्रधान नरेंद्र मोदी मध्य आशियाई देश आणि रशियाच्या आठदिवसीय दौऱ्याच्या पहिल्या टप्प्प्यात सोमवारी उझबेकिस्तानच्या राजधानीत दाखल झाले.

Modi in Uzbekistan | मोदी उझबेकिस्तानात

मोदी उझबेकिस्तानात

ताश्कंद : पंतप्रधान नरेंद्र मोदी मध्य आशियाई देश आणि रशियाच्या आठदिवसीय दौऱ्याच्या पहिल्या टप्प्प्यात सोमवारी उझबेकिस्तानच्या राजधानीत दाखल झाले. विमानतळावर उझबेकिस्तानचे पंतप्रधान शौकत मीरोमोनोविच मिर्जीयोयेव यांनी मोंदींचे स्वागत केले.
तत्पूर्वी मोदी सहा देशांच्या दौऱ्यावर नवी दिल्ली येथून रवाना झाले होते. मोदी उझबेकिस्तानातून मंगळवारी कझाकिस्तानला रवाना होतील. ते आठ जुलैला रशियाला जाणार आहेत. तेथून १० जुलैला तुर्कमेनिस्तान, ११ जुलैला किर्गिस्तान व १२ जुलैला ताजिकिस्तानला जातील. (वृत्तसंस्था)

Web Title: Modi in Uzbekistan