शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
3
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
4
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
5
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
6
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
7
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
8
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
9
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
10
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
11
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
12
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
13
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
14
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
15
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
16
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
17
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
18
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
19
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
20
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
Daily Top 2Weekly Top 5

प्रचारात मोदी टॉपवर; आतापर्यंत ८३ सभा! प्रचार करण्यात विरोधक जवळपासही नाहीत

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 10, 2024 06:39 IST

३१ मार्च ते ५ मे या तीन टप्प्यांतील निवडणूक प्रचारात सर्वाधिक निवडणूक प्रचारसभा घेण्याचा विक्रम पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नावावर झाला आहे.

संजय शर्मालोकमत न्यूज नेटवर्कनवी दिल्ली: लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात पंतप्रधान नरेंद्र मोदी ३१ मार्च ते ५ मे या पहिल्या तीन टप्प्यांत ८३ प्रचारसभा घेऊन पहिल्या क्रमांकावर आहेत. १४ मे रोजी वाराणसीमध्ये उमेदवारी दाखल करण्यापूर्वी पंतप्रधान मोदी १३ मे रोजी विशाल 'रोड शो' करणार आहेत.

३१ मार्च ते ५ मे या तीन टप्प्यांतील निवडणूक प्रचारात सर्वाधिक निवडणूक प्रचारसभा घेण्याचा विक्रम पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नावावर झाला आहे. ८३ निवडणूक सभा घेऊन पंतप्रधान मोदींनी आपल्या पक्षातील सर्व नेत्यांना आणि विरोधी पक्षांच्या नेत्यांना खूप मागे टाकले आहे. या काळात पंतप्रधान मोदींनी १८ राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये ८३ निवडणूक सभा आणि 'रोड शो'मध्ये भाग घेतला आहे.

भाजपच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, गृहमंत्री अमित शाह ६६ निवडणूक सभा आणि 'रोड शो' सह दुसऱ्या क्रमांकावर आहेत. काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी ४० निवडणूक - सभांना संबोधित केले, तर प्रियांका गांधी यांनी २९ निवडणूक सभांना संबोधित केले.

आता निवडणुकीच्या प्रचाराच्या चौथ्या, पाचव्या, सहाव्या आणि सातव्या टप्प्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी भारतीय जनता पक्षाला निवडणूक सभांपेक्षा 'रोड शो' करण्याचे निर्देश दिले आहेत. १४ मे रोजी उमेदवारी दाखल करण्यापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी १३ मे रोजी वाराणसीमध्ये विशाल रोड शो' करणार आहेत. मोदी यांच्या रोड शोपूर्वीच्या सर्व तयारींचा आढावा घेण्यात येत आहे.

यंदा सर्वाधिक प्रचारसभा, 'रोड शो' करणारे नेते...पंतप्रधान नरेंद्र मोदी ८३केंद्रीय गृहमंत्री अमित शाह 33काँग्रेस नेते राहुल गांधी ४०प्रियांका गांधी २९

सर्व नेते वाराणसीत येणार मोदी यांच्या उमेदवारीसाठी २५ ते ३० समर्थकांची नावे निश्चित करण्यात आली आहेत. त्यामध्ये विविध जाती, जमातींचे लोक आहेत. यांना समर्थक बनवून मोदी हे कोणत्याही एका जाती-धर्माचे नसून त्यांना सर्व जाती-धर्माचा पाठिंबा मिळत आहे, असा संदेश दिला जाणार आहे. पंतप्रधानांचा उमेदवारी अर्ज भरण्याच्या प्रक्रियेदरम्यान भाजप आणि एनडीएचे सर्व वरिष्ठ नेते वाराणसीला पोहोचण्याची शक्यता आहे.

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीlok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४