वाराणसी : स्वच्छ भारत या मोहिमेचा प्रसार आपल्या मतदारसंघात करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हाती फावडे घेऊन गंगा नदीच्या किना:यावर असलेल्या अस्सी घाटाजवळ साठलेली घाण स्वच्छ करीत या योजनेला उत्तर प्रदेशात मूर्त स्वरूप दिले.
पंतप्रधान शनिवारी सकाळी अस्सी घाटावर पोहोचले व त्यांनी तेथे गंगेची पूजा केली. यानंतर मोदींनी हातात फावडे घेऊन घाटाजवळ साठलेला गाळ उपसण्यास सुरुवात केली.
यावेळी महापौर राम गोपाल मोहाले, प्रदेशाध्यक्ष लक्ष्मीकांत वाजपेयी यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. 15 मिनिटे हा गाळ काढून झाल्यानंतर त्यांनी या अभियानाला राज्यात यशस्वीपणो राबविण्याची जबाबदारी मुख्यमंत्री अखिलेश यादव यांच्या नेतृत्वात नऊ व्यक्तींवर सोपविली.
यावेळी बोलताना मोदींनी गंगा स्वच्छतेच्या अभियानात येथील नागरिकांनी सहभागी व्हावे, असे आवाहन केले.
काही सामाजिक संस्थांनी हे घाट महिनाभरात स्वच्छ होतील, असे आश्वासन मला दिले आहे. त्यांचे शब्द हे वास्तवात बदलतील अशी मी अपेक्षा व्यक्त करतो, अशा शब्दात त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.
यानंतर त्यांनी माँ श्री आनंदमयी यांच्या आश्रमात गेले. त्यांनी या आश्रमातील लोकांसोबत चर्चा केली व एका रुग्णालयाचीही पाहणी केली.
स्वच्छ भारत अभियानाचे नऊ कार्यकर्ते
गांधी जयंतीला देशातील अस्वच्छता संपविण्याचा विडा उचललेल्या मोदींनी उत्तर प्रदेशच्या स्वच्छतेसाठी नऊ कार्यकत्र्यावर ही जबाबदारी सोपविली आहे. त्यात भोजपुरी अभिनेता मनोज तिवारी, सुफी गायक कैलाश खेर, विनोदी अभिनेते राजू श्रीवास्तव, क्रिकेटपटू मोहंमद कैफ व सुरेश रैना, चित्रकूटमध्ये स्वामी रामभद्राचार्य, संस्कृत विद्वान देवीप्रकाश द्विवेदी व लेखक मनु शर्मा यांचा समावेश आहे. (वृत्तसंस्था)
बालपणीच्या स्मृती ताज्या झाल्या : पंतप्रधान
4वाराणसीच्या दोन दिवसांच्या दौ:यादरम्यान डिङोल लोकोमोटिव्ह वर्क्सच्या गेस्टहाऊसमध्ये मुक्काम केलेल्या मोदींनी येथे राहिल्याने बालपणीच्या स्मृती ताज्या झाल्या, अशा शब्दात आपल्या भावना व्यक्त केल्या. बालपणीचा तो काळ, रेल्वेचे डबे, प्रवासी हे डोळ्यांसमोर येऊन ते सगळे ताजे झाल्याची अनुभूती त्यांनी यावेळी घेतल्याचे म्हटले. त्यांनी गेस्टहाऊसच्या नोंदवहीत बालपणापासूनच माङो रेल्वेसोबत, रेल्वे स्टेशनसोबत नाते राहिले आहे. या वातावरणात त्या सगळ्या आठवणींना उजाळा मिळाला, या वास्तव्याने मला पुन्हा माङया बालपणाशी जोडून दिले, असे नोंदविले.
4मोदींचे वडील दामोदरदास हे गुजरातच्या वाडनगर रेल्वेस्थानकावर चहाचे दुकान चालवीत असत. मोदी लहानपणी वडिलांना या कामात मदत करीत असत.