मुजाहिदीनप्रमाणेच लोकं मोदींनाही घाबरतात - प्रमोद कृष्णम

By Admin | Updated: November 6, 2015 11:40 IST2015-11-06T11:39:22+5:302015-11-06T11:40:00+5:30

देशातील जनता जेवढी इंडियन मुजाहिदीनच्या दहशतवाद्यांना घाबरते तेवढीच मोदींनाही घाबरते असे सांगत धर्मगुरु आचार्य प्रमोद कृष्णम यांनी मोदींची तुलना दहशतवाद्यांशी केली आहे.

Modi too fears Modi as Mujahideen - Pramod Krishnam | मुजाहिदीनप्रमाणेच लोकं मोदींनाही घाबरतात - प्रमोद कृष्णम

मुजाहिदीनप्रमाणेच लोकं मोदींनाही घाबरतात - प्रमोद कृष्णम

ऑनलाइन लोकमत

नवी दिल्ली, दि. ६ -  देशातील जनता जेवढी इंडियन मुजाहिदीनच्या दहशतवाद्यांना घाबरते तेवढीच मोदींनाही घाबरते असे सांगत धर्मगुरु आचार्य प्रमोद कृष्णम यांनी मोदींची तुलना दहशतवाद्यांशी केली आहे. कृष्णम यांच्या विधानाने आता वाद निर्माण झाला आहे. 

गेल्या काही दिवसांत देशातील असहिष्णूतेच्या वातावरणावरुन राजकारणात आरोप प्रत्यारोपांची मालिका सुरु आहे. धर्मगुरु आचार्य प्रमोद कृष्णम यांनी मोदींविषयी वादग्रस्त विधान करत आगीत तेल ओतण्याचे काम केले आहे. कृष्णम यांनी मोदींची तुलना दहशतवाद्यांशी केली आहे. कृष्णम यांनी भाजपा खासदार साक्षी महाराज व योगी आदित्यनाथ यांच्यावरही घणाघाती टीका केली आहे. साक्षी महाराज हे बलात्कारी असून योगी आदित्यनाथ हे गुंडप्रवृत्तीचे आहेत असा आरोपही त्यांनी केला. तीन वर्षांपूर्वी मुझफ्फरनगर येथील दंगलीप्रकरणी कृष्णम हे चर्चेत आले होते.  

 

Web Title: Modi too fears Modi as Mujahideen - Pramod Krishnam