मोदी सडकछाप नेत्यासारखे बोलत आहेत - शकील अहमद
By Admin | Updated: October 13, 2014 10:32 IST2014-10-13T09:30:52+5:302014-10-13T10:32:37+5:30
हरियाणा विकासात गुजरातपेक्षा मागे असल्याचे सांगणारे नरेंद्र मोदी खोटं बोलत असल्याचा आरोप करत मोदींचे बोलणे सडकछाप नेत्यासारखे असल्याची टीका शकील अहमद यांनी केली.

मोदी सडकछाप नेत्यासारखे बोलत आहेत - शकील अहमद
>ऑलाइन लोकमत
चंडीगड, दि. १३ - हरियाणा विकासात गुजरातपेक्षा मागे असल्याचे सांगणारे नरेंद्र मोदी खोटं बोलत असून त्यांचं बोलणं सडकछाप नेत्यासारखे असल्याची टीका काँग्रेसचे नेते शकील अहमद यांनी केली आहे. मोदींची वक्तव्ये पंतप्रधानपदाला शोभणारी नसून त्यांनी पदाची शान घालवली आहे, असा आरोपही अहमद यांनी एका संमेलनातील भाषणादरम्यान केला.
'जी व्यक्ती भारतासारख्या देशातील एवढ्या उच्च पदावर विराजमान आहे, त्या व्यक्तीने प्रचारसभा, संसद किंवा आंतरराष्ट्रीय मंचावर भाषण केले तरी ती व्यक्ती देशाचा पंतप्रधान म्हणूनच बोलत असते, असे अहमद यांनी म्हटले. पाकिस्तानने केलेल्या शस्त्रसंधीच्या उल्लंघनाबाबत किंवा हरियाणा विकासात मागे पडल्याबाबत पंतप्रधानांनी जे भाष्य केले ते सडकछाप नेत्याप्रमाणे होते, असेही ते म्हणाले.
पाकिस्तानच्या कारवायांना तोंड देण्यासाठी, घुसखोरी रोखण्यासाठी ५६ इंचांची छाती हवी असे लोकसभा निवडणुकीदरम्यान मोदींनी म्हटले होते. मात्र ते पंतप्रधान झाल्यावरही पाकिस्तानच्या कारवाय कायम असून त्यांची ५६ इंचांची ५.६ इंचांची झाली का? असा सवालही अहमद यांनी केला. हरियाणातील जनतेला मूर्ख बनवण्याचा मोदींचा प्रयत्न असल्याचा आरोपही त्यांनी केला.