मोदी, सुषमांचे लोकसभेत जोरदार स्वागत
By Admin | Updated: March 16, 2017 00:38 IST2017-03-16T00:38:03+5:302017-03-16T00:38:03+5:30
उत्तरप्रदेश व उत्तराखंडातील अभूतपूर्व विजयानंतर पंतप्रधान मोदींचे भाजपच्या तमाम सदस्यांनी लोकसभेत जयश्रीराम, हरहर मोदी घरघर मोदी

मोदी, सुषमांचे लोकसभेत जोरदार स्वागत
सुरेश भटेवरा, नवी दिल्ली
उत्तरप्रदेश व उत्तराखंडातील अभूतपूर्व विजयानंतर पंतप्रधान मोदींचे भाजपच्या तमाम सदस्यांनी लोकसभेत जयश्रीराम, हरहर मोदी घरघर मोदी, भारत माता की जय घोषणा देत, बाके वाजवत जोरदार स्वागत केले. आजारपणानंतर सभागृहात परतलेल्या सुषमा स्वराज यांचे सर्वपक्षीय सदस्यांनी तितक्याच उत्साहाने स्वागत केले.
पंतप्रधान बुधवारी प्रथमच लोकसभेत येताच भाजपचे सारे सदस्य जागेवर उठून उभे राहिले. ते आले, तेव्हा संचार मंत्रालयाशी संबंधित प्रश्नोत्तरे सुरू होती. काही क्षण कामकाज स्तब्ध झाले. सत्ताधारी सदस्यांच्या जोडीला बीजू जनता दलाचे जे. पांडाही बाके वाजवताना दिसले तर टीआरएसच्या जीतेंद्र रेड्डींनी पंतप्रधानांना भेटून त्यांचे अभिनंदन केले. सुषमा स्वराजांचे स्वागत करताना काँग्रेसचे गटनेते मल्लिकार्जुन खरगे म्हणाले, दीर्घकाळानंतर सभागृहात तुमचा आवाज दुमदुमतो आहे, ही आनंदाची बाब आहे. तुम्हाला दीर्घायुष्य लाभो अशी मी प्रार्थना करतो. सुषमा स्वराजांनी सर्व सदस्यांचे आभार मानले.