शहरं
Join us  
Trending Stories
1
अभिनेता-नेता विजयने जाणीवपूर्वक उशीर केल्याने झाली मोठी चेंगराचेंगरी; मृतांची संख्या ४१ वर
2
लडाखला परके करताय, वांगचुक यांना सोडा; कारगिल डेमोक्रॅटिक अलायन्सची मागणी
3
शेतकऱ्यांचं मरण : महिनाभरात २६ लाख हेक्टरला फटका; खरिप हंगामातील ५२ लाख हेक्टरवरील पिके गेली पाण्यात
4
सायबर फसवणुकीवर आता एआयचा लगाम; मोबाइल नंबर व आयपी ॲड्रेस होतील ब्लॉक
5
अखेर 'त्या' आईने लढाई जिंकली, २० वर्षांनंतर ६० लाखांची भरपाई; नेमकं प्रकरण काय?
6
ट्रम्प बनले व्हिलन! केली नवी घोषणा; चित्रपटांवरही लावला १००% टॅरिफ
7
‘स्थानिक’ निवडणुकीत दोस्त दोस्त ना रहा! महायुती अन् महाविकास आघाडी फुटणार
8
चांदी दीड लाखांवर, ९ महिन्यांत ७५% लाभ! का वाढतेय चांदीची किंमत?
9
संपादकीय : संवेदनशीलतेचा पंचनामा! आता केवळ आर्थिक नव्हे, सरकारी मनाची कसोटी लागणार
10
आता विद्यार्थी ऑनलाइनही शाळेमध्ये दिसणार हजर; यू-डायस प्रणालीत प्रवेश नोंदीसाठी १७ ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ
11
राजेंद्र लोढांना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी; फॉरेन्सिक ऑडिट सुरू
12
Asia Cup 2025: मोहसीन नक्वी टीम इंडियाला ट्रॉफी द्यायला झाले तयार, पण आता ठेवली 'ही' एक अट
13
तब्बल २२ वाहने चोरणाऱ्या आंतरराज्य चोरट्याला सांगलीत अटक; १६ लाखांचा मुद्देमाल जप्त
14
भरधाव ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वार पती-पत्नी जागीच ठार; कोहमारा-वडसा मार्गावरील घटना
15
भाजपा पदाधिकाऱ्याची पत्नीसह ३ ठिकाणी मतदारयादीत नावे, एका दुकानावर २५ नावे- काँग्रेसचा आरोप
16
पंतप्रधान मोदी करणार ‘मुख्यमंत्री अल्पमुदतीचे रोजगारक्षम अभ्यासक्रम’ कार्यक्रमाचे उद्घाटन
17
'या' दिवसापर्यंत गपचूप ट्रॉफी भारताला द्या नाहीतर...; BCCIचे मोहसीन नक्वी यांना 'अल्टीमेटम'
18
दहिसर टोलनाका वाहतूककोंडी दूर करण्यासाठी मंत्री प्रताप सरनाईक यांनी सुचवल्या उपाययोजना
19
१०० वर्षांनी हंस महालक्ष्मी योग: ८ राशींचे कल्याण, कल्पनेपलीकडे लाभ; अपार यश, भरघोस भरभराट!
20
“शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान, भरीव मदत सरकार देईल, उद्या मंत्रिमंडळ बैठकीत...”: संजय शिरसाट

मोदी-सिंग भेटीने हलचल

By admin | Updated: May 28, 2015 01:22 IST

रालोआ सरकारवर बुधवारी जोरदार हल्लाबोल केल्यानंतर तासाभरातच माजी पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंग पंतप्रधान नरेंद्र मोदींना भेटण्यासाठी त्यांच्या ७, रेसकोर्स या शासकीय निवासस्थानी गेले.

४० मिनिटे चर्चा : भाजपा तसेच काँग्रेसच्या अंत:स्थ गोटातही अनभिज्ञताच हरीष गुप्ता- नवी दिल्लीरालोआ सरकारवर बुधवारी जोरदार हल्लाबोल केल्यानंतर तासाभरातच माजी पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंग पंतप्रधान नरेंद्र मोदींना भेटण्यासाठी त्यांच्या ७, रेसकोर्स या शासकीय निवासस्थानी गेले. मोदींच्या टष्ट्वीटनुसार ४० मिनिटांच्या या ‘ग्रेट भेटी’ने राजधानीत अनेकांच्या भुवया उंचावल्या. भाजपा तसेच काँग्रेसच्या अंत:स्थ गोटात काही काळ या भेटीविषयी अनभिज्ञताच होती.उभय बाजूंनी आक्रमक टीकेच्या फैरी झडल्यानंतर अल्पावधीतच मोदी यांनी भेटण्याची इच्छा व्यक्त केली असता त्यानुसार सिंग यांनी पंतप्रधानांची भेट घेतली. गेल्या वर्षभरात मोदी व सिंग यांची शासकीय कार्यक्रमांच्या निमित्ताने अनेकदा जाहीर भेट झाली आहे. पण त्या दोघांतच झालेली ही पहिली भेट राजकीय चर्चेचा विषय बनली. अर्थात मोदींनी पंतप्रधानपदाची सूत्रे स्वीकारल्यानंतर सौजन्यापोटी केलेल्या फोन कॉलला नुकत्याच पायउतार झालेल्या डॉ. सिंग यांनी त्वरित प्रतिसाद दिला होता, या २०१४च्या मे महिन्यातील आठवणीलाही या निमित्ताने उजाळा मिळाला. संपुआ सरकारच्या काळात काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी ‘घटनाबाह्य’ शक्ती’च्या रूपात कार्यरत होत्या. परंतु आता मात्र घटनात्मक मार्गानेच सरकार चालविले जात आहे, अशी टीका मोदी बुधवारी मोदी यांनी एका मुलाखतीत केली. आम्ही घटनात्मक मार्गाने काम करीत आहोत आणि कुण्या ‘घटनाबाह्यह्ण शक्तींचे मुळी ऐकतच नाहीत, असा आरोप असेल तर मी स्वत:ला या आरोपाबद्दल दोषी मानतो.’ मोदी यांनी सोनिया गांधी आणि राहुल गांधी या दोघांवरही शरसंधान केले. तर काँग्रेसच्या एका कार्यक्रमात डॉ. सिंग यांनी मोदी सरकारवर आकस्मिकपणे आक्रमक पलटवार केला. केंद्रातील नरेंद्र मोदी सरकार गैरमुद्यांकडे लोकांचे लक्ष वळविण्यासाठी भ्रष्टाचाराचा राग आळवत आहे. आपण कधीही स्वत:च्या, कुटुंबाच्या किंवा मित्र परिवाराच्या फायद्यासाठी पदाचा दुरुपयोग केलेला नाही, अशा शब्दांत माजी पंतप्रधान डॉ. सिंग यांनी मोदी सरकारवर तोफ डागली. २जी लायसेंसप्रकरणी सहकार्य न केल्यास परिणाम भोगावे लागतील, अशी धमकी मनमोहनसिंग यांनी आपल्याला दिली होती, असा आरोप ‘ट्राय’चे माजी अध्यक्ष प्रदीप बैजल यांनी आपल्या पुस्तकात केला आहे. शिवाय भाजपाध्यक्ष अमित शहा यांनी असंख्य घोटाळ््यांविषयी केलेल्या टीकेच्या पार्श्वभूमीवर डॉ. सिंग यांनी हे वक्तव्य केले. तोच बुधवारच्या भेटीचा संदर्भ असावा, असा कयास आहे. काही कारणांमुळे मंगळवारी ही भेट होऊ शकली नाही आणि बुधवारी सायंकाळी ६.३० वाजता उभय नेत्यांची भेट घडून आली, असे मनमोहनसिंग यांच्या कार्यालयातील सूत्रांनी सांगितले. मोदींना मनमोहनसिंग यांच्यासोबत आर्थिक आणि विदेश धोरणाशी संबंधित मुद्यांवर चर्चा करावयाची होती. त्यामुळे त्यांच्या पुढाकारानेच ही भेट घडून आली.- आनंद शर्मा, नेते, काँग्रेसच्डॉ. मनमोहनसिंगजी यांना भेटून आणि ७, रेसकोर्सवर त्यांचे पुन्हा एकदा स्वागत करून खूप आनंद झाला. आमची ही भेट ग्रेटभेट होती,’ असे मोदी यांनी या भेटीनंतर टिष्ट्वटरवर म्हटले आहे. या भेटीचा हृद्य फोटोही मोदींच्या टष्ट्वीटर हँडलवर टाकण्यात आला. च्राहुल गांधी यांच्या ‘सुटाबुटातील सरकार’ या आरोपावर मोदी म्हणाले, वर्ष लोटले तरी काँग्रेसला लोकसभा निवडणुकीत मिळालेला पराभव अद्याप पचविता आलेला नाही. जनतेने काँग्रेसला तिच्या चुका व पापांबद्दल दंड दिला आहे.