शहरं
Join us  
Trending Stories
1
मद्य धोरण प्रकरणात ‘आप’देखील आरोपी; ईडीने दाखल केले नवे आरोपपत्र, इतिहासातील पहिलीच घटना
2
तुमच्या हातात विकसित भारत सोपवूनच जाईन, मुंबईला धक्का लागू देणार नाही: PM नरेंद्र मोदी
3
महागाई, बेरोजगारी, खोटेपणा हीच मोदी यांची गॅरंटी: खरगे, २ कोटी रोजगारांवरुन चढवला हल्लाबोल
4
मी माझा मुलगा तुमच्याकडे सोपवतेय, तो तुम्हाला निराश करणार नाही: सोनिया गांधी
5
सच्चा शिवसैनिक काँग्रेसला मतदान करणार नाही, आमच्याकडे खरी शिवसेना: CM एकनाथ शिंदे
6
अतिरेकी हल्ल्यातील शहिदांचा अपमान करणाऱ्यांना जागा दाखवा: देवेंद्र फडणवीस
7
नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान होणार, त्यांच्याकडून महाराष्ट्राच्या अपेक्षा: राज ठाकरे 
8
तिकडे सगळे गद्दार, नकली, भाडोत्री लोक... इकडे सगळे असली आहेत; उद्धव ठाकरे यांचा हल्लाबोल
9
हीच भटकती आत्मा तुम्हाला सत्तेबाहेर बसवेल हे नक्की; शरद पवारांची सडकून टीका
10
आम्हाला जेलमध्ये पाहायचे नसेल तर इंडिया आघाडीच्या उमेदवारांना विजयी करा: अरविंद केजरीवाल
11
महाराष्ट्रात चालणार नाहीत तुमचे नखरे, कारण, आमच्यासोबत आले आहेत राज ठाकरे: रामदास आठवले
12
मतदानाची आकडेवारी प्रसिद्ध करण्यात अडचण काय? सर्वोच्च न्यायालयाचा निवडणूक आयोगाला सवाल
13
४०० इमारतींवर होर्डिंग्जचा भार; स्ट्रक्चरल ऑडिटकडे महापालिका लक्ष देणार काय? 
14
भावेशच्या एजन्सीचे लाभार्थी कोण? बँक खात्याची पाळेमुळे खणणार, २६ मेपर्यंत पोलिस कोठडी
15
मतदारराजा तुझ्याचसाठी सर्व तयारी; मतदान प्रक्रियेसाठी शहर जिल्हा प्रशासन सज्ज
16
मुंबई इंडियन्सची लाजीरवाणी हार, शेवटच्या क्रमांकावर समाधान! रोहित शर्मा, नमन धीर यांचा संघर्ष व्यर्थ
17
"आता मराठीतही मेडिकल, इंजीनियरिंगचे शिक्षण घेणे शक्य होणार"! PM मोदींनी दिली आनंदाची बातमी
18
राहुल गांधींकडून वदवून घ्या की, स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल...; PM मोदींचं शरद पवारांना आव्हान
19
निकोलस पूरनने दोन खणखणीत सिक्स खेचले, अर्जुन तेंडुलकरने मैदान सोडले; नेमके काय घडले?
20
"ते गरीब-गरीब करत माळच जपायचे, मोदीने 25 कोटी लोकांना गरीबीतून बाहेर काढले"; पंतप्रधानांचा काँग्रेसवर हल्लाबोल 

सरकार पाडण्याचा ‘ड्रामा’ मोदींनी थांबवावा : गेहलोत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 02, 2020 12:10 AM

बंडखोरांना माफीबाबत श्रेष्ठींनी ठरवावे

जयपूर : राजस्थानमधील काँग्रेसचे सरकार पाडण्याच्या भाजपाच्या कारस्थानात कथित सामील असलेल्या केंद्रीय मंत्र्यांमध्ये मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी शनिवारी गजेंद्र सिंग शेखावत यांच्यासह धर्मेद्र प्रधान यांचेही नाव घेतले आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राजस्थानमधील हा पाडापाडीचा ‘ड्रामा’ थांबवावा, असे आवाहन केले. सचिन पायलट व अन्य १८ काँग्रेस आमदारांच्या कथित बंडानंतर जयपूरबाहेरच्या फेअरमॉन्ट रिसॉर्टमध्ये ठेवलेल्या काँग्रेस आमदारांना शुक्रवारी सायंकाळी जैसलमेरमधील रिसॉर्टमध्ये हलविण्यात आले. तेथून जयपूरला परतताना पत्रकारांशी बोलताना गेहलोत यांनी शेखावत व प्रधान यांच्यासह उतरही काही केंद्रीय मंत्री या पाडापाडीत सहभागी असल्याचा आरोप केला आणि पंतप्रधान मोदींनी हा ‘ड्रामा’ थांबवावा, असे आवाहन केले.बंडखोरांबाबत मवाळ रोखच्सचिन पायलट यांच्यावर अगदी ‘निकम्मा’ म्हणण्यापर्यंत तोंडसुख घेणाऱ्या गेहलोत यांचा बंडखोरांबद्दल जरा मवाळ रोख दिसला. बंडखोरांना माफ करणार का, असे विचारता ते म्हणाले की, ते पक्षाच्या हायकमांडने ठरवायचे आहे. हायकमांडने माफ केल्यास मी त्यांना (बंडखोरांना) आलिंगनही देईन.च्माझा यात काही व्यक्तिगत स्वार्थ नाही. पक्षाने माझ्यावर विश्वास टाकला व मला भरभरून दिले. मला केंद्रात मंत्री केले, अखिल भारतीय सरचिटणीस केले व प्रदेश काँग्रेसचा अध्यक्ष आणि तीन वेळा मुख्यमंत्रीही केले. याहून मला आणखी काय हवे आहे. मी जे काही करतो आहे ते लोकांसाठी करतो आहे.