मोदींनी इंदिरा गांधीसारखे धाडस दाखवावे - तोगडिया

By Admin | Updated: July 28, 2015 16:24 IST2015-07-28T16:11:28+5:302015-07-28T16:24:23+5:30

पाकिस्तानच्या बाबतीत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी इंदिरा गांधींसारखे धाडस दाखवले पाहिजे असे खडे बोल विश्व हिंदू परिषदेचे अध्यक्ष प्रवीण तोगडिया यांनी मोदी सरकारला सुनावले आहे.

Modi should show such courage as Indira Gandhi - Togadia | मोदींनी इंदिरा गांधीसारखे धाडस दाखवावे - तोगडिया

मोदींनी इंदिरा गांधीसारखे धाडस दाखवावे - तोगडिया

>ऑनलाइन लोकमत 
जयपूर, दि. २८ - पाकिस्तानच्या बाबतीत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी इंदिरा गांधींसारखे धाडस दाखवले पाहिजे असे खडे बोल विश्व हिंदू परिषदेचे अध्यक्ष प्रवीण तोगडिया यांनी मोदी सरकारला सुनावले आहे. विद्यमान सरकारचे परराष्ट्र धोरण सपशेल अपयशी ठरल्याची टीकाही त्यांनी केली आहे. 
जयपूरमधील एका कार्यक्रमात गुरदासपूरमधील दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर प्रवीण तोगडिया यांनी मोदी सरकार टीकास्त्र सोडले. आंबे, साडी पाठवून किंवा फक्त हात मिळवण्याऐवजी पाकला धडा शिकवला पाहिजे, ज्याप्रमाणे म्यानमारमध्ये जाऊन आपण दहशतवाद्यांना मारले त्याचप्रमाणे पाकव्याप्त काश्मीरमध्ये जाऊन दहशतवाद्यांचा खात्मा केला पाहिजे असे त्यांनी नमूद केले. अमेरिकेने पाकमध्ये जाऊन ओसामाला मारले, यातून आपण बोध घेऊन पाकमध्ये जाऊन दाऊदला मारले पाहिजे असेही त्यांनी म्हटले आहे. दहशतवाद्यांचे समर्थन करणा-यांवर समाजाने बहिष्कारच टाकायला हवा असे सांगत त्यांनी शत्रुघ्न सिन्हा, सलमान खान आदी मंडळींवर निशाणा साधला. 

Web Title: Modi should show such courage as Indira Gandhi - Togadia