मोदी - शहांनी करुन दाखवलं, भाजपा जगातील सर्वात मोठा पक्ष

By Admin | Updated: March 30, 2015 10:49 IST2015-03-30T09:39:44+5:302015-03-30T10:49:06+5:30

भाजपाने सदस्य नोंदणी अभियानात तब्बल ८.८ कोटी सदस्यांना पक्षाशी जोडून चीनच्या कम्यूनिस्ट पक्षाला धोबीपछाड केले आहे.

Modi - Shankar made, BJP is the world's largest party | मोदी - शहांनी करुन दाखवलं, भाजपा जगातील सर्वात मोठा पक्ष

मोदी - शहांनी करुन दाखवलं, भाजपा जगातील सर्वात मोठा पक्ष

ऑनलाइन लोकमत

नवी दिल्ली, दि. ३० - लोकसभेत भाजपाला भरघोस मताधिक्य मिळवून देणारे नरेंद्र मोदी व त्यानंतर महाराष्ट्र, हरियाणा या राज्यांमध्ये भाजपाचा झेंडा रोवणारे पक्षाध्यक्ष अमित शहा या जोडीने आता भाजपाला जगातील सर्वात मोठा पक्ष  अशी नवी ओळख मिळवून दिली आहे. भाजपाने सदस्य नोंदणी अभियानात तब्बल ८.८ कोटी सदस्यांना पक्षाशी जोडून चीनच्या कम्यूनिस्ट पक्षाला धोबीपछाड केले आहे.

लोकसभा व विधानसभेत मिळालेल्या यशानंतर भाजपाने देशभरात सदस्य नोंदणी अभियान राबवायला सुरुवात केली आहे. या मोहीमेत भाजपाने रविवारी ८.८ कोटी सदस्यांचा आकडा गाठला आहे. जगात चीनमधील कम्यूनिस्ट पक्षाचे सर्वाधिक म्हणजेच ८.६ कोटी सदस्य असून जगातिल सर्वात मोठा पक्ष हा विक्रम कम्यूनिस्ट पक्षाच्या नावावर होता. मात्र भाजपाने चीनच्या कम्यूनिस्टांना मागे टाकत अव्वल क्रमांक गाठला आहे. आगामी महिनाभरात पक्ष १० कोटींचा आकडा सहज गाठेल अशी आशा पक्षातील वरिष्ठ नेते वर्तवत आहे. पक्षाध्यक्ष अमित शहा येत्या काही दिवसांमध्ये पत्रकार परिषद घेऊन या विक्रमाची अधिकृत घोषणा करणार आहेत. 

महाराष्ट्र, उत्तरप्रदेश, गुजरात, मध्यप्रदेश या राज्यांमधून भाजपाच्या सदस्य नोंदणी अभियानाला चांगला प्रतिसाद मिळत असल्याचे सूत्रांनी सांगितले. 

 

 

Web Title: Modi - Shankar made, BJP is the world's largest party