मोदी-पुतीन वार्षिक शिखर बैठक आज
By Admin | Updated: December 11, 2014 00:02 IST2014-12-11T00:02:50+5:302014-12-11T00:02:50+5:30
भारत-रशिया द्विपक्षीय संबंध आणखी दृढ करण्याच्या इराद्याने पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांच्यात गुरुवारी वार्षिक शिखर बैठक होत आह़े

मोदी-पुतीन वार्षिक शिखर बैठक आज
चर्चा : अणुऊर्जा, तेल-वायू क्षेत्रवर असेल भर
नवी दिल्ली : भारत-रशिया द्विपक्षीय संबंध आणखी दृढ करण्याच्या इराद्याने पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांच्यात गुरुवारी वार्षिक शिखर बैठक होत आह़े अणुऊर्जा, पेट्रोलजन्य इंधन तसेच सुरक्षेसारख्या प्रमुख क्षेत्रत सहकार्य वाढविण्यावर या बैठकीत उभय पक्षांचा भर असेल़
युक्रेन मुद्यावर अमेरिका तसेच अमेरिकीधाजिर्ण्या पश्चिमी देशांनी रशियावर प्रतिबंध लादले आहेत़ हे प्रतिबंध प्रभावहीन करण्याच्यादृष्टीने आपला जुना मित्र असलेल्या भारतासोबत आर्थिक सहकार्य वाढीच्या शक्यता रशिया शोधू पाहत आह़े या पाश्र्वभूमीवर मोदी-पुतीन बैठक महत्त्वपूर्ण मानली जात आह़े या दौ:यात उभय देश 15 ते 2क् करारांवर स्वाक्षरी करू शकतात़ गत 2क्क्क् पासून दरवर्षी दोन्ही देशांत अशा शिखर बैठकीचे आयोजन केले जात आह़े
अणुऊर्जा संयत्र उभारणी तसेच तंत्रज्ञान व सामरिक क्षेत्रतील सहकार्य हे भारतासोबतच्या चर्चेच्या अजेंडय़ावरील प्रमुख मुद्दे असल्याचे पुतीन यांनी म्हटले आह़े भारत रशियाला द्रवरूप नैसर्गिक वायूची निर्यात करण्यास तसेच आíक्टक क्षेत्रत तेल व वायूच्या शोधात ओएनजीसीला सामील करण्यास इच्छूक असल्याचेही पुतीन यांनी म्हटले आह़े
अमेरिका आणि चीननंतर भारत हा तिसरा सर्वाधिक तेल आयात करणारा देश आह़े त्यामुळे रशियातील तेल व वायू योजनांमध्ये मोठी भूमिका साकारण्यास भारतही उत्सुक असून उद्याच्या मोदी-पुतीन बैठकीत या मुद्यावरील चर्चा जवळपास निश्चित आह़े रशियाकडे मोठय़ा प्रमाणात नैसर्गिक वायूचे साठे आहेत़ (लोकमत न्यूज नेटवर्क)
4अणुऊर्जा क्षेत्रत रशिया भारतात 2क् ते 24 अणुऊर्जा संयंत्रे उभारण्याचा प्रस्ताव ठेवू शकतो़ या मुद्यावर उभय देश सहकार्यवाढीवर चर्चा करू शकतात़
4रशिया आपल्या नव्या डिझाईनचे अणुऊर्जा संयंत्रे लावण्यासाठी प्रतीक्षा करीत आह़े बैठकीत हा मुद्दा उपस्थित होऊ शकतो़
4पुतीन यांच्यासोबत रशियाचे 15 प्रमुख उद्योगपतीही भारतात येत आहेत़ त्याअनुषंगाने व्यापार क्षेत्रतील सहकार्य वृद्धिंगत करण्याचा विषय प्रामुख्याने चर्चेच्या अजेंडय़ावर असू शकतो़