मोदी जातीयवादाचे विष पेरत आहेत
By Admin | Updated: November 14, 2014 02:30 IST2014-11-14T02:30:21+5:302014-11-14T02:30:21+5:30
पंतप्रधान नरेंद्र मोदी जातीयवादाचे विष पेरत असून पंडित जवाहरलाल नेहरू यांचा ‘उदार भारत’ उद्ध्वस्त करू पाहणा:यांविरुद्ध जोरदार लढा द्या,

मोदी जातीयवादाचे विष पेरत आहेत
नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी जातीयवादाचे विष पेरत असून पंडित जवाहरलाल नेहरू यांचा ‘उदार भारत’ उद्ध्वस्त करू पाहणा:यांविरुद्ध जोरदार लढा द्या, असे आवाहन काँग्रेसच्या अध्यक्ष सोनिया गांधी यांनी येथे केले आहे. नेहरूंच्या 125 व्या जयंतीवरून निर्माण झालेला वाद आता अधिक तीव्र झाला आहे.
आधुनिक भारताचे शिल्पकार पं. जवाहरलाल नेहरू यांनी उदार भारताचा दृष्टिकोन ठेवला होता. तो संपविण्याचे जोरदार प्रयत्न होत आहेत. ज्या शक्तींनी हे चालवले आहे त्यांनी नेहरूंचे व्यक्तिमत्त्व नव्हे, तर त्यांची विचारधारा, त्यांचा दृष्टिकोन आणि योगदानाला लक्ष्य बनविले आहे. या शक्तींचा मुकाबला करण्यासाठी आपल्याला व्यापक जनआंदोलन उभारावे लागेल, तरच देशाची सहनशीलतेची आणि सलोख्याची घडी कायम राहील, असे सोनिया म्हणाल्या. नेहरू जयंतीच्या पूर्वसंध्येला गुरुवारी तालकटोरा मैदानावर दिल्ली प्रदेश काँग्रेसने आयोजित केलेल्या कार्यक्रमात काँग्रेसच्या अध्यक्ष सोनिया गांधी आणि उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी मोदींचा नामोल्लेख टाळला असला तरी त्यांच्या भाषणाचा रोख अर्थातच मोदींकडे होता.
सध्या ‘क्रोधित लोक’ देश चालवत आहेत. प्रेम आणि बंधुभावाचा पाया उद्ध्वस्त केला जात आहे, असे राहुल गांधी म्हणाले.
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंग आणि माजी मुख्यमंत्री शीला दीक्षित, अहमद पटेल, आनंद शर्मा, मोतीलाल व्होरा, मल्लिकार्जुन खरगे, शकील अहमद, बी. के. हरिप्रसाद, मुकुल वासनिक आणि अन्य नेते उपस्थित होते. (विशेष प्रतिनिधी)
4मोदींवर जातीयवादाचे विष पेरत असल्याचा आरोप करणारा काँग्रेस पक्ष पं. नेहरूंच्या जयंतीचा आधार घेऊन समाजात फूट पाडण्याचे आणि द्वेषभावना पसरविण्याचे राजकारण करीत आहे, असे भाजपाचे प्रवक्ते शाहनवाज हुसेन म्हणाले.