मोदी फॉर पीएम, केजरीवाल फॉर सीएम - आपचं पॉलिटिकल ब्लंडर
By Admin | Updated: November 8, 2014 09:28 IST2014-11-08T09:28:18+5:302014-11-08T09:28:18+5:30
राजकीय आतमहत्या म्हणता येईल असा प्रकार आम आदमी पार्टीने शुक्रवारी केला. त्यांनी त्यांच्या अधिकृत वेबसाईटवर मोदी फॉर पीएम, केजरीवाल फॉर सीएम असं बॅनर

मोदी फॉर पीएम, केजरीवाल फॉर सीएम - आपचं पॉलिटिकल ब्लंडर
>ऑनलाइन टीम
नवी दिल्ली, दि. ८ - राजकीय आतमहत्या म्हणता येईल असा प्रकार आम आदमी पार्टीने शुक्रवारी केला. त्यांनी त्यांच्या अधिकृत वेबसाईटवर मोदी फॉर पीएम, केजरीवाल फॉर सीएम असं बॅनर लावलं आणि नवी दिल्लीतल्या रहिवाशांची अशी मागणी असल्याची पुस्तीही जोडली. दिल्लीमध्ये काँग्रेसचे अस्तित्व संपण्याची चिन्हे असताना विधानसबेच्या लढतीसाठी मुख्य प्रतिस्पर्धी आप व भाजपा असतिल अशी चिन्हे आहेत. या पार्श्वभूमीवर पंतप्रधान आणि भाजपाचे स्टार कँपेनर नरेंद्र मोदी यांच्यावर अशा प्रकारे शिक्कामोर्तब करणे आपला चांगलेच महागात पडेल अशी चिन्हे आहेत. आपच्या वेबसाईटवर सदर बॅनर लागल्यानंतर सोशल मीडियावर आपवर टीकेचा भडीमार झाल. त्यानंतर पार्टीने हे बॅनर साईटवरून काढले, परंतु त्यांची व्हायची तेवढी नाचक्की झालीच.
केजरीवाल हा चेहरा विकण्यासाठी आपला मोदींच्या नावाची व चेह-याची मदत घ्यावी लागते हे क्लेषदायक असल्याची टीका काहींनी केली, तर मोदींनी दिल्ली निवडणुकांपासून लांब रहावे आणि त्यांच्या करीश्म्याचा प्रभाव निवडणुकांवर पडू नये यासाठी आपने केलेली ही केविलवाणी धडपड असल्याची टिप्पणीही काहींनी केली आहे. असे पायावर धोंडा मारून घेणारे पाऊन आपने का उचलले याबद्दल तर्कवितर्क लढवले जात असले तरी आता पक्ष यावर काय प्रतिक्रिया देतो याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.