मोदींनी आफ्रिकेलाही जाणे गरजेचे -ओमर
By Admin | Updated: April 22, 2015 02:46 IST2015-04-22T02:46:15+5:302015-04-22T02:46:15+5:30
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या परदेश दौऱ्यावर आता जम्मू-काश्मीरचे माजी मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनीही कानपिचक्या दिल्या.

मोदींनी आफ्रिकेलाही जाणे गरजेचे -ओमर
श्रीनगर : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या परदेश दौऱ्यावर आता जम्मू-काश्मीरचे माजी मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनीही कानपिचक्या दिल्या. परदेशात जाणे गैर नाही. मात्र, मोदींनी आता आफ्रिकेसारख्या पारंपरिक देशालाही भेट द्यावी, अशा शब्दांत ओमर यांनी टोला लगावला.
ओमर यांनी टिष्ट्वटरवर लिहिले की, ‘पंतप्रधान मोदींमध्ये खूप दोष असू शकतात. मात्र त्यांच्या परदेश दौऱ्यावर काहीतरी टीका करणे योग्य नाही. त्यांनी परदेशात जावे आणि मैत्री संबंध बळकट करावेत.’ पंतप्रधानांनी केवळ फ्रान्स आणि जर्मनी यासारख्या प्रसिद्धीचे वलय असलेल्या देशांसोबतच आफ्रिकेसह आपल्या पारंपरिक मित्रदेशांनाही भेटी द्याव्यात, अशी माझी इच्छा असल्याचे ओमर म्हणाले.