शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
6
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
7
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
8
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
9
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
10
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
11
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
12
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
13
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
14
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
15
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
16
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
17
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
18
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
19
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
20
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

मनमोहन सिंग मंचावर येताच विद्यार्थ्यांनी 'मोदी-मोदी' घोषणा दिल्या अन्...

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 8, 2019 10:29 IST

जयपूरमधील महाविद्यालयाच्या कार्यक्रमात घडला प्रकार

जयपूर: माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या जयपूरमधील एका महाविद्यालयाच्या कार्यक्रमात काही विद्यार्थ्यांनी मोदी-मोदी अशा घोषणा दिल्या. मनमोहन सिंग व्यासपीठावर येताच विद्यार्थ्यांनी घोषणाबाजी केली. काही वेळ विद्यार्थ्यांची घोषणाबाजी सुरू होती. यानंतर माजी पंतप्रधानांनी भारतीय लोकशाही आणि अर्थव्यवस्थेवर भाष्य केलं. यावेळी सिंह यांचा जेकेएलयू लॉरेट पुरस्कारानं सन्मान करण्यात आला.  उदारीकरणाच्या धोरणांवर उभ्या असलेल्या आर्थिक सुधारणा सुरुच राहायल्या हव्यात असं मत मनमोहन सिंग यांनी त्यांच्या भाषणात व्यक्त केलं. पाच ट्रिलियनची अर्थव्यवस्था शक्य आहे. मात्र त्यासाठी एक ठोस योजना असायला हवी, असं माजी पंतप्रधान म्हणाले. गरिबी, सामाजिक असमानता, सांप्रदायिकता, धार्मिक कट्टरता आणि भ्रष्टाचार या लोकशाही समोरच्या प्रमुख समस्या असल्याचं सिंग यांनी म्हटलं. देशावरील मंदीचं सावट, घसरलेला जीडीपी यावरदेखील मनमोहन सिंग यांनी भाष्य केलं. 'सध्या देशाच्या अर्थव्यवस्थेची वाढ अतिशय संथ गतीनं होत आहे. जीडीपी घसरला आहे. गुंतवणुकीवरही परिणाम झाला आहे. शेतकरी संकटात आहे. बँकिंग व्यवस्थेसमोरही अडचणी निर्माण झाल्या आहेत. बेरोजगारी वाढत आहे. या परिस्थितीतही पाच ट्रिलियन डॉलरच्या अर्थव्यवस्थेचं लक्ष्य गाठलं जाऊ शकतं. मात्र त्यासाठी विचारपूर्वक रणनिती आखून तिची काटेकोर अंमलबजावणी करायला हवी,' असं प्रतिपादन सिंग यांनी केलं. सरकारनं कर दहशतवाद रोखायला हवा, इतरांच्या विचारांना सन्मान करायला हवा, असंदेखील ते म्हणाले.उदारीकरणाच्या पायावर उभ्या असलेल्या आर्थिक सुधारणा कायम ठेवणं ही काळाची गरज असल्याचं मत राज्यसभेचे खासदार असलेल्या मनमोहन सिंग यांनी व्यक्त केलं. देशातील लोकशाही बळकट करण्यासाठी दूरदृष्टी असलेल्या नेतृत्वाची आवश्यकता आहे. देशाचं सामर्थ्य संविधानात आहे. त्यामुळे राजकीय पक्षांनी संविधानातील मूल्यांच्या रक्षणासाठी कटिबद्ध असायला हवं, असं माजी पंतप्रधान म्हणाले.  

टॅग्स :Manmohan Singhमनमोहन सिंगNarendra Modiनरेंद्र मोदी