शहरं
Join us  
Trending Stories
1
केरळच्या राजधानीत भाजपाचा ऐतिहासिक विजय, डाव्या पक्षांचा अनेक वर्षांपासूनचा बालेकिल्ला ढासळला
2
'धन्यवाद तिरुवनंतपुरम'; थरूर यांच्या बालेकिल्ल्यात भाजपचा झेंडा! पंतप्रधान मोदींनी मानले केरळच्या जनतेचे आभार
3
...तर थेट मुख्य सचिवांवरच हक्कभंग आणू; राहुल नार्वेकरांचा विधानसभेत संताप, नेमके काय घडले?
4
नवा ट्विस्ट! "पवन सिंहला धमकी दिली नाही, जे करतो ते..."; लॉरेन्स बिश्नोई गँगचा ऑडिओ व्हायरल
5
शरद पवार यांच्या वाढदिवसाच्या पार्टीत राहुल गांधी आणि गौतम अदानी आले आमने-सामने, त्यानंतर घडलं असं काही...
6
Lionel Messi : Video - "फ्रॉड करून गेला, १२ हजारांचं तिकीट..."; मेस्सीची झलक न दिसल्याने फॅन्स प्रचंड चिडले
7
लग्नाच्या नावाखाली अल्पवयीन मुलींचा सौदा; राज ठाकरेंच्या पत्रावर CM फडणवीस म्हणाले, "९० टक्के मुली परत आल्या"
8
“महाराष्ट्र विधानपरिषद देशासाठी आदर्श”; विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांचे कौतुकोद्गार
9
टीम इंडियाचं नेमकं कुठं चुकतंय? गौतम गंभीरच्या रणनीतीवर रॉबिन उथप्पाची टीका
10
Mamata Banerjee : "मी माफी मागते"; मेस्सीच्या कार्यक्रमातील गोंधळ पाहून मुख्यमंत्री ममता बॅनर्जी नाराज
11
H-1B व्हिसाच्या नव्या नियमांवरुन ट्रम्पच गोत्यात, वॉशिंग्टन ते कॅलिफोर्नियापर्यंत १९ राज्यांनी कोर्टाचा दरवाजा ठोठावला
12
इंडिगोला आणखी एक धक्का; रांचीत लँडिंग दरम्यान 'टेल स्ट्राइक'; थोडक्यात वाचले ७० प्रवासी
13
Lionel Messi: सॉल्ट लेक स्टेडियम तोडफोडप्रकरणी आयोजकाला अटक, प्रेक्षकांनाही तिकिटाचे पैसे परत मिळणार!
14
WhatsApp कॉलवर बोलताय? तुमचं लोकेशन होऊ शकतं ट्रॅक; सुरक्षिततेसाठी ऑन करा 'ही' सेटिंग
15
"आम्ही थांबणार नाही..", दुसऱ्या बाळाच्या जन्माआधीच भारती सिंग करतेय तिसऱ्या बाळाचं प्लानिंग? पती हर्ष म्हणाला...
16
Stock Market Holidays: पुढच्या वर्षी १५ दिवस बंद राहणार शेअर बाजार, पाहा NSE मध्ये सुट्ट्या कधी, पाहा लिस्ट
17
कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी उपस्थित केलं भाजपाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह, म्हणाले, येथे सर्व निर्णय... 
18
जिथं वक्फचा वाद उफाळला, तिथे भाजपाला मिळाला 'ऐतिहासिक' विजय; केरळमध्ये हैराण करणारा निकाल
19
Gold-Silver Rate Today: सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; १८ कॅरेट सोनंही १ लाखांच्या पार, मुंबई ते दिल्ली नवे दर काय?
20
“विधान परिषदेतील नियम, परंपरा आणि चर्चांमुळे लोकशाही बळकट”: केंद्रीय मंत्री नितीन गडकरी
Daily Top 2Weekly Top 5

पीएम मोदी इटली दौऱ्यावर जाणार? जॉर्जिया मेलोनींच्या निमंत्रणावर 'हे' उत्तर दिले...

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 11, 2025 12:11 IST

भारत आणि इटली हे एकमेकांसाठी अत्यंत महत्त्वाचे धोरणात्मक भागीदार आहेत.

Narendra Modi-Giorgia Melony:इटलीचे उपपंतप्रधान आणि परराष्ट्र मंत्री अँटोनियो तजानी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींसोबत झालेल्या भेटीला अतिशय सकारात्मक ठरवले आहे. भारताच्या तीन दिवसीय दौऱ्यावर असलेले तजानी बुधवार(दि.10) सायंकाळी पीएम मोदींना भेटले. या भेटीदरम्यान त्यांनी इटलीच्या पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांच्या वतीने मोदींना पुढच्या वर्षी इटलीला भेट देण्याचे औपचारिक निमंत्रण दिले. पंतप्रधान मोदींनीही या निमंत्रणाला होकार दिल्याचे तजानी यांनी सांगितले.

भेटीत काय चर्चा झाली?

पीएम मोदी आणि इटलीच्या प्रतिनिधीमंडळादरम्यान औद्योगिक सहकार्य, सांस्कृतिक संबंध, व्यापार, तंत्रज्ञान आणि रणनीतिक भागीदारी यावर सविस्तर चर्चा झाली. या भेटीनंतर मीडियाशी संवाद साधताना अँटोनियो तजानी यांनी पंतप्रधान मोदींशी झालेल्या भेटीला अत्यंत सकारात्मक म्हणत, दोन्ही देशांमधील धोरणात्मक भागीदारी अधिक दृढ होत असल्याचे अधोरेखित केले. 

भारत-इटली संबंध आता नवीन युगात प्रवेश करत असून, पुढील काही वर्षांत दोन्ही देशांमधील सहकार्य अधिक वेगाने वाढेल. भारत आणि इटली हे एकमेकांसाठी अत्यंत महत्त्वाचे धोरणात्मक भागीदार आहेत. तसेच, जागतिक महत्त्वाच्या प्रश्नांवर, विशेषतः रशिया-युक्रेन संघर्षाच्या संदर्भात भारताची भूमिका निर्णायक ठरू शकते, असे तजानी यांनी स्पष्ट केले. तजानी यांच्या भारत दौर्‍याने भारत-इटली संबंध एक नवीन टप्प्यात प्रवेश करत असल्याचे स्पष्ट संकेत मिळतात. 

द्वीपक्षीय संबंध अधिक मजबूत होणार...

या भेटीमुळे दोन्ही देशातील सहकार्य तंत्रज्ञान, उद्योग, व्यापार, संस्कृती आणि राजनय या क्षेत्रांमध्ये जलद गतीने वाढताना दिसत आहे. विशेष म्हणजे, मोदी-मेलोनी यांच्या मागील काही वर्षांतील भेटी पाहता दोन्ही नेत्यांमध्ये उल्लेखनीय समन्वय आणि सुसंवाद दिसून येतो.  एकूणच, भारत-इटली संबंध आर्थिक आणि रणनीतिक दोन्ही पातळ्यांवर आगामी काळात अधिक वेगाने मजबूत होत जाणार, हे या भेटीतून स्पष्ट झाले आहे.

मोदी-मेलोनी यांच्या उल्लेखनीय भेटी:

नोव्हेंबर 2022, बाली (G20): मेलोनी यांची मोदींसोबत पहिली भेट; भारत-इटली संबंधांचा नवीन अध्याय.

2-3 मार्च 2023, नवी दिल्ली: मेलोनींची पहिली अधिकृत भारत यात्रा; रणनीतिक भागीदारीची घोषणा.

सप्टेंबर 2023, नवी दिल्ली (G20): दोन्ही नेत्यांची सहजता आणि जिव्हाळा सोशल मीडियावर चर्चेचा विषय.

14 जून 2024, इटली (G7): मेलोनी यांनी मोदींचे यजमान म्हणून स्वागत; तिसऱ्या कार्यकाळासाठी शुभेच्छा.

18 नोव्हेंबर 2024, रियो (G20): इंडिया-इटली जॉईंट स्ट्रॅटेजिक ॲक्शन प्लॅन 2025-2029 ची घोषणा.

23 नोव्हेंबर 2025, दक्षिण आफ्रिका (G20): दहशतवाद वित्तपुरवठा रोखण्यासाठी संयुक्त उपक्रमाची घोषणा.

 

English
हिंदी सारांश
Web Title : PM Modi to visit Italy? Meloni's invitation gets a response.

Web Summary : PM Modi accepted Italy's invitation following discussions on trade, technology, and strategic partnerships. Italy values India's role, especially regarding the Russia-Ukraine conflict. Bilateral relations are strengthening across various sectors.
टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीIndiaभारतItalyइटली