शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
3
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
4
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
5
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
6
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
7
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
8
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
9
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
10
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
11
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
12
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
13
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
14
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
15
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
16
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
17
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
18
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
19
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
20
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

मोदींनी काँग्रेसवर केला पलटवार, सांगितला विकासाचा अर्थ

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 8, 2017 14:23 IST

गुजरातमध्ये विकास वेडा झाला आहे, अशी टीका करत भाजपाला अडचणीत आणणाऱ्या काँग्रेससह अन्य विरोधकांवर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी जोरदार पलटवार केला.

वडनगर/ अहमदाबाद -  गुजरातमध्ये विकास वेडा झाला आहे, अशी टीका करत भाजपाला अडचणीत आणणाऱ्या काँग्रेससह अन्य विरोधकांवर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी जोरदार पलटवार केला. आपल्या जन्मगावी वडनगर येथे गेलेल्या मोदींनी आपल्या सरकारने केलेल्या विकासकामांची यादी वाचत काँग्रेसवर टीका केली. तसेच मोदींनी सभेला उपस्थित असणाऱ्यांना गुजरातीमधून विकासाचा अर्थ विचारला. रुग्णालय बांधणे हा विकास नाही काय असे मोदींनी विचारले त्यावर उपस्थितांनी हो असे उत्तर दिले.काँग्रेसवर टीका करताना मोदी म्हणाले," अटल बिहारी वाजपेयी यांच्या कार्यकाळात आरोग्यविषयक धोरण ठरवण्यात आले होते. त्यानंतर मात्र दहा वर्षे जे सरकार सत्ते होते त्याने हे धोरण गुंडाळून ठेवले. या सरकारला विकासाचे वावडे होते. आता कुठे आमच्या सरकारने नवे धोरण बनवले."यावेळी मोदींनी संपूर्ण गुजरात हगंदारीमुक्त झाल्याचाही आवर्जुन उल्लेख केला, " चांगल्या आरोग्याची हमी केवळ डॉक्टर आणि चांगल्या खाण्यापिण्यावर आधारलेली नसते. तर ती स्वच्छतेवरही अवलंबूनी असते. आज संपूर्ण गुजरात हगणदारीमुक्त झाले आहे. त्यासाठी मी  गुजरात सरकारचे अभिनंदन करतो. स्वच्छतेमुळे गरिबांना चांगले आरोग्य मिळेल. त्यासाठी आम्ही हे अभियान सुरू केले. चांगल्या स्वच्छतेमुळे गरिबांचे दरवर्षी 50 हजार रुपये वाचतील." दरम्यान, मोदी मंचावर असताना त्यांचे भाऊ पंकज मोदी मात्र इतर उपस्थितांप्रमाणेच खालील गर्दीत बसले होते. त्यांच्याकडे विचारणा केली असता त्यांनी आपण सर्वसामान्य नागरिक आहोत. कुणी व्हीआयपी नाही, असे त्यांनी सांगितले. पंतप्रधान नरेंद्र मोदी गुजरातमधील त्यांच्या वडनगर या जन्मगावी आले आहेत. पंतप्रधानपदाची सुत्रे हातात घेतल्यानंतर वडनगरलायेण्याची मोदींची ही पहिलीच वेळ आहे. गावात प्रवेश केल्यानंतर त्यांनी त्यांच्या शाळेला भेट दिली. यावेळी ते अत्यंत भावूक झाले होते.  शाळेची पायरी चढताच जमीनीवर माथा टेकवला आणि कपाळाला शाळेची माती लावली.  पंतप्रधान नरेंद्र मोदी दोन दिवसाच्या गुजरात दौऱ्यावर आहेत. आज ते त्यांच्या जन्मगावी वडनगरला पोहचले. यावेळी त्यांच्या स्वागतासाठी रस्ताच्याकडेला पंचक्रोशीतील हजारो लोक उभे होते. मात्र गावात जाताच त्यांनी सर्वात आधी त्यांनी ज्या शाळेत शिक्षण घेतले त्या शाळेला भेट दिली आणि शाळेची माती कपाळाला लावली. त्यानंतर शाळेच्या प्रत्येक वर्ग खोल्यात जाऊन पाहणी केली.  

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीGujaratगुजरातGovernmentसरकारBJPभाजपाIndian National Congressइंडियन नॅशनल काँग्रेस