मोदीच देशातील सर्वात लोकप्रिय नेते मुख्यमंत्र्यांचा शिवसेनेला टोला

By Admin | Updated: February 13, 2015 23:10 IST2015-02-13T23:10:59+5:302015-02-13T23:10:59+5:30

नागपूर: पंतप्रधान नरेंद्र मोदी देशातील सर्वात लोकप्रिय नेते असून त्यांना जनतेने निवडून दिले आहे, असे सांगत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मोदींच्या लोकप्रियतेवर प्रश्नचिन्ह निर्माण करणाऱ्या शिवसेनेला टोला लगावला.

Modi is the leader of the country's most popular leader Shiv Sena | मोदीच देशातील सर्वात लोकप्रिय नेते मुख्यमंत्र्यांचा शिवसेनेला टोला

मोदीच देशातील सर्वात लोकप्रिय नेते मुख्यमंत्र्यांचा शिवसेनेला टोला

गपूर: पंतप्रधान नरेंद्र मोदी देशातील सर्वात लोकप्रिय नेते असून त्यांना जनतेने निवडून दिले आहे, असे सांगत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मोदींच्या लोकप्रियतेवर प्रश्नचिन्ह निर्माण करणाऱ्या शिवसेनेला टोला लगावला.
मुख्यमंत्री नागपूरमध्ये एका कार्यक्रमासाठी आले असता पत्रकारांशी बोलत होते. शिवसेनेच्या मुखपत्रातून मोदींवर होणाऱ्या टीकेच्या संदर्भात त्यांना विचारले असता ते म्हणाले की, भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना या दोन्ही पक्षांची मैत्री २५ वर्षे जुनी आहे. त्यामुळे छोट्या छोट्या गोष्टींमुळे दोन्ही पक्षांत वाद होणार नाही.
स्वाईन फ्लू
राज्यात स्वाईन फ्लूमुळे दगावणाऱ्या रुग्णांची संख्या वाढत आहे, याकडे फडणवीस यांचे लक्ष वेधले असता ते म्हणाले की, आरोग्य मंत्री याकडे लक्ष ठेवून आहेत. स्वाईन फ्लूवर नियंत्रण आणण्यासाठी आवश्यक त्या उपाययोजना केल्या जात आहे.
पीक हानीचा आढावा
राज्यातील काही भागात गारपीट आणि अवकाळी पावसामुळे पीक हानी झाली आहे. मागील वर्षीच्या तुलनेत याचे प्रमाण कमी असले तरीही सरकारने यासंदर्भात आढावा घेतला असून योग्य त्या उपाययोजना केल्या जात आहेत, असे फडणवीस म्हणाले. शनिवारी मोदी बारामतीला भेट देणार आहेत. याकडे त्यांचे लक्ष वेधले असता ते म्हणाले की ,राज्याच्या विकासाबाबत मोदी नेहमीच विचार करतात. त्याच अनुषंगाने हा दौरा आहे. (प्रतिनिधी)

Web Title: Modi is the leader of the country's most popular leader Shiv Sena

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.