शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
4
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
5
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
6
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
7
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
8
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
9
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
10
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
11
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
12
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
13
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
14
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
15
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
16
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
17
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
18
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
19
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
20
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

हरयाणात मोदी लाटेचा तडाखा, भाजपाला सर्वच जागांवर आघाडी 

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 23, 2019 15:03 IST

हरयाणातील सोनिपत मतदारसंघात भाजपचे उमेदवार रमेश चंद्र कौशिक यांनी कॉंग्रेसच्या भूपेंद्रसिंह हुडडा यांच्यावर कायम आघाडी घेतली आहे.

सोनिपत -  हरयाणालोकसभा निवडणुकीत भाजपाला मोठे यश मिळाले आहे. भाजपाने लोकसभेच्या 10 पैकी 10 जागांवर आघाडी मिळवत हरयाणाच्या मातीतही कमळ खुलवले आहे. हरयाणातील लोकसभेच्या 10 जागांपैकी भाजपाने 9 जागांवर आघाडी घेतली आहे. तर, कॉंग्रेसने दोनवेळा रोहतक मतदारसंघात आघाडी घेतली होती. पण, भाजपा उमेदवार अरविंद शर्मा यांनी कॉंग्रेस उमेदवार दिपेंद्रसिंह हुड्डा यांना मात दिली. सोनिपात लोकसभा मतदारसंघात कॉंग्रेस उमेदवार आणि माजी मुख्यमंत्री भूपेंद्रसिंह हुड्डा यांनीही मोदी लाट अद्याप कायम असल्याचे म्हटले आहे. 

हरयाणातील सोनिपत मतदारसंघात भाजपचे उमेदवार रमेश चंद्र कौशिक यांनी कॉंग्रेसच्या भूपेंद्रसिंह हुडडा यांच्यावर कायम आघाडी घेतली आहे. हरयाणातील 39 ठिकाणच्या 90 मतदान केंद्रांवर मतमोजणी सुरू आहे. हरयाणातील 10 लोकसभा मतदारसंघात 12 मे रोजी मतदान घेण्यात आले होते. येथे भाजपा, आयएनएलडी आणि कॉंग्रेस या तीन पक्षात प्रामुख्याने लढत होती. हरयाणातील रोहतक आणि सोनिपत मतदारसंघाकडे राज्यातील जनतेचे लक्ष लागले आहे. या मतदारसंघात पिता-पुत्र आपले नशीब आजमावत होते. मात्र, भाजपाच्या मोदी लाटेपुढे हुड्डा पिता पुत्रांना पराभवाचा सामना करावा लागत असल्याचे चित्र दिसत आहे. गुडगाव लोकसभा मतदारसंघात भाजपा उमेदवार इंद्रजीतसिंह यांचा विजय निश्चित मानला जात आहे. त्याचप्रमाणे, अंबाला, भिवानी, गुज्जर, हिसार, कुरुक्षेत्र, सिरसा, सोनिपत या मतदारसंघात भाजपा उमेदवार आघाडीवर आहेत. दरम्यान, 2014 च्या निवडणुकीत भाजपने 07, इएनएलडीने 2 आणि कॉंग्रेसने एका जागेवर विजय मिळवला होता. सध्याची आकडेवारी पाहता भाजपाला 10 जागांवर विजय मिळण्याची शक्यता आहे.  

टॅग्स :Haryanaहरयाणाlok sabhaलोकसभाLok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक २०१९Narendra Modiनरेंद्र मोदीBJPभाजपा