शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
3
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
4
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
5
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
6
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
7
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
8
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
9
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
10
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
11
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
12
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
13
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
14
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
15
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
16
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
17
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
18
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
19
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
20
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

वाराणसीच्या रस्त्यांवर पंतप्रधान नरेंद्र मोदी बेपत्ता झाल्याचे पोस्टर्स

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 19, 2017 12:27 IST

उत्तर प्रदेशातील वाराणसीच्या रस्त्यांवर पंतप्रधान नरेंद्र मोदी बेपत्ता झाल्याचे पोस्टर्स लावण्यात आले आहेत.

ठळक मुद्दे उत्तर प्रदेशातील वाराणसीच्या रस्त्यांवर पंतप्रधान नरेंद्र मोदी बेपत्ता झाल्याचे पोस्टर्स लावण्यात आले आहेत. वाराणसी पंतप्रधान नरेंद्र मोदींचा मतदार संघ आहेभिंतीवर लावलेल्या पोस्टरमध्ये लिहिलं आहे की, बेपत्ता वाराणसीचे खासदार.

वाराणसी, दि. 19- उत्तर प्रदेशातील वाराणसीच्या रस्त्यांवर पंतप्रधान नरेंद्र मोदी बेपत्ता झाल्याचे पोस्टर्स लावण्यात आले आहेत. वाराणसी पंतप्रधान नरेंद्र मोदींचा मतदार संघ आहे. वाराणसी भागाचे ते खासदार आहेत. भिंतीवर लावलेल्या पोस्टरमध्ये लिहिलं आहे की, बेपत्ता वाराणसीचे खासदार. तसंच पोस्टरवर मोदींचा फोटोही लावण्यात आला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासाठी पोस्टरवर एक घोषणा लिहिण्यात आली आहे.  'जाने वह कौन सा देश जहां तुम चले गए' असं त्या पोस्टर्सवर लिहिण्यात आलं आहे. पण हे पोस्टर नेमकं कोणी लावलं याबद्दलची कुठलीही माहिती अजून उपलब्ध झालेली नाही.

पोस्टरच्या सगळ्यात खाली पोस्टर लावणाऱ्याने एक ओळ लिहिली आहे. 'एक लाचार, असहाय्य आणि हताश काशीवासी', असं त्या व्यक्तीने म्हंटलं आहे. वाराणसीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी बेपत्ता झाल्याचे पोस्टर्स लागल्यावर तेथिल प्रशासकीय विभागात चांगलीच खळबळ उडाली. पोलिसांनी तात्काळ पाऊलं उचलत रात्री उशिरा रस्त्यावरील पोस्टर्स हटविली. मोदी बेपत्ता झाल्याचे पोस्टर लावणाऱ्याबद्दल अजून कुठलीही माहिती मिळालेली नाही. 

मोदींचा पत्ता लागला नाही तर नाईलाजाने मोदी बेपत्ता झाल्याची तक्रार काशीवासीयांना करावी लागेल, असंही त्या पोस्टरमध्ये म्हंटलं आहे. 

राहुल गांधी बेपत्ता असल्याचंही झळकावलं होतं  पोस्टरकाँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांचं लोकसभा क्षेत्र असलेल्या अमेठी भागात राहुल गांधी बेपत्ता असल्याचे पोस्टर्स लावण्यात आले होते. राहुल गांधी यांना शोधून आणणाऱ्यांना बक्षीस मिळणार असल्याचंही या पोस्टर्समध्ये नमूद करण्यात आलं होतं. अमेठीमधील काँग्रेस कार्यालयाच्या समोरच हे पोस्टर लावण्यात आलं. या पोस्टरवर लिहिलं आहे,'माननीय खासदार राहुल गांधी अमेठीमधून बेपत्ता आहेत. ज्यामुळे खासदाराकडून केली जाणारी विकास कामं यांच्या कार्यकाळात ठप्प आहेत. राहुल गांधी यांच्या या व्यवहारामुळे अमेठीच्या लोकांच्या मनात अपमानित भावना निर्माण झाली आहे'. काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी गेली सहा महिने अमेठीमध्ये हजेरी लावली नसल्याने तेथिल लोकांनी असे पोस्टर्स लावल्याची चर्चा सुरू होती.

आरएसएस आणि भाजपाच्या लोकांकडून राहुल गांधी यांना बदनाम करण्याचा प्रयत्न केला जातो आहे. राहुल गांधी राष्ट्रीय उपाध्यक्ष आहेत म्हणून ते प्रत्येक वेळी अमेठीमध्ये उपस्थित राहू शकत नाही, असं प्रदेश काँग्रेस कमिटीचे जिल्हाध्यक्ष योगेन्द्र मिक्षा म्हणाले होते.  

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीThe Bharatiya Janata Partyभारतीय जनता पार्टी