शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशात युनूस सरकार मावळणार, संध्याकाळी मोठी घोषणा होणार; संपूर्ण जगाचं लक्ष वेधलं
2
महाराष्ट्रातील सीमेवरील गावात गुजरातची घुसखोरी; सीमांकन हळूहळू वाढवत असल्याचा स्थानिकांचा दावा
3
आम्हाला तर पाकिस्तान सोबत येणे शक्य, पण हे दोन देश...; नव्या समूहासंदर्भात काय म्हणाला बांगलादेश
4
'स्वाभिमानाने जगणारा कोकणातला शेतकरी आज चिंतेत', वलसाड हापूसवरून भास्कर जाधव आक्रमक
5
व्हॉट्सअ‍ॅपवरची एक चूक थेट घेऊन जाऊ शकते तुरुंगात! 'ही' गोष्ट करताना किमान दहा वेळ विचार कराच
6
पाकिस्तानमध्ये कधी येणार? 'रेड सी फिल्म फेस्टिव्हल'मध्ये आलिया भटला चाहत्याचा प्रश्न; म्हणाली...
7
ऐश्वर्यासोबतच्या घटस्फोटाच्या चर्चांवर अखेर अभिषेक बच्चनने सोडलं मौन, म्हणाला- "माझ्या पत्नीला..."
8
धक्कादायक! दारुच्या नशेत होता बोगस डॉक्टर; YouTube पाहून ऑपरेशन, चुकीची नस कापली अन्...
9
Gold Silver Price Today: यावर्षी सोनं ₹५२,७९५ आणि चांदी ₹१००९३६ रुपयांनी महागली; आजही दरानं तोडले सर्व विक्रम, पाहा किंमत
10
पुढील वर्षात १ तोळा सोन्यासाठी किती पैसे मोजावे लागणार? ब्रोकरेज फर्मने सांगितला मोठा आकडा
11
लुथरा बंधूंचे थायलंडमधून फोटो आले, पासपोर्टसह घेतले ताब्यात; कारवाईपासून वाचण्यासाठी पळाले खरे पण...
12
व्हॉट्सअप चॅट्स वाचण्यासाठी...! डीएसपी 'कल्पना वर्मा' यांच्या 'लव्ह ट्रॅप' प्रकरणात 'Love U यार...' ची एन्ट्री...
13
Geminid Meteor Shower: १३,१४ डिसेंबर ठरणार इच्छापूर्तीची रात्र; आकाशाकडे बघून करा 'हे' काम!
14
'एसी-थ्री टियर'मध्ये प्रवाशासोबत कुत्रा! रेल्वेतून नेता येतो का? व्हिडिओ व्हायरल होताच रेल्वे 'सेवा' झाली सक्रिय
15
माइंडमेश समिट २०२५: विद्या-कला-नीती पुरस्कारांची घोषणा; समाजाला आकार देणाऱ्यांचा सन्मान
16
३ महिन्यांतच गमावलेलं दुसरं बाळ, पहिल्यांदाच व्यक्त झाली सुनीता अहुजा, म्हणाली- "तिला श्वास घ्यायला त्रास व्हायचा..."
17
म्यानमारमध्ये गृहयुद्धामुळे हाहाकार; रुग्णालयातील एअर स्ट्राईकमध्ये ३० जणांचा मृत्यू, ७० जखमी
18
अमेरिकेच्या संसदेत मोदी-पुतिन यांच्या 'त्या' फोटोवर खळबळ; महिला खासदाराचा ट्रम्प यांच्या परराष्ट्र धोरणावर हल्लाबोल
19
FD चे व्याजदर कमी झाल्याने बॉन्डमध्ये गुंतवणूक करताय? 'हे' ५ मोठे धोके तुम्हाला माहीत असायलाच हवेत
Daily Top 2Weekly Top 5

लक्ष वळविण्याची मोदी सरकारची चाल, भाजपावर कॉंग्रेसकडून दडपशाहीचा आरोप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 1, 2018 01:39 IST

माजी केंद्रीय अर्थमंत्री पी. चिदंबरम यांचे पुत्र कार्ती यांना बुधवारी सीबीआयने केलेली अटक हा केवळ सूडाच्या राजकारणाचा भाग आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकार स्वत:च्या भ्रष्ट कारभारावरील लोकांचे लक्ष दुसरीकडे वळविण्यासाठी हे जाणीवपूर्वक करीत आहे, असा आरोप बुधवारी काँग्रेसकडून करण्यात आला.

नवी दिल्ली : माजी केंद्रीय अर्थमंत्री पी. चिदंबरम यांचे पुत्र कार्ती यांना बुधवारी सीबीआयने केलेली अटक हा केवळ सूडाच्या राजकारणाचा भाग आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकार स्वत:च्या भ्रष्ट कारभारावरील लोकांचे लक्ष दुसरीकडे वळविण्यासाठी हे जाणीवपूर्वक करीत आहे, असा आरोप बुधवारी काँग्रेसकडून करण्यात आला.काँग्रेसच्या प्रवक्त्या प्रियांका चतुर्वेदी म्हणाल्या की, कार्ती यांना आयएनक्स मीडिया कंपनीला विदेशी गुंतवणूक प्रोत्साहन बोर्ड (एफआयपीबी) कडून मिळालेल्या मंजुरीत गैरव्यवहार केल्याप्रकरणी अटक केली आहे. कार्ती हे काही नीरव मोदी वा चोकसीसारखे पळून जाणारे नव्हते. किंबहुना ते परदेशातून परत आले होते. मोदी-चोकसीच्या पलायनाला मदत करायची आणि राजकीय विरोधकांना त्रास द्यायचा, असे मोदी सरकारचे राजकारण आहे.परंतु काँग्रेस पक्ष या कारवाईमुळे नाउमेद होणार नाही. या प्रकरणातील सत्य लवकर जनतेसमोर मांडले जाईल. कार्ती यांच्यावर केलेली कारवाई हे फक्त सूडाचे राजकारण आहे, असेही त्यांनी सांगितले.मोदी सरकारच भ्रष्ट : नीरव मोदी, मेहुल चोकसी, द्वारकादास सेठ ज्वेलर्स आदी प्रकरणात दररोज नवी माहिती समोर येत आहे. त्यातून मोदी सरकारचा भ्रष्ट कारभार उघडा पडत आहे. यावरून लोकांचे लक्ष अन्यत्र वळविण्यासाठी मोदी सरकारने ही चाल खेळली आहे, असे प्रियांका चतुर्वेदी म्हणाल्या. विरोधकांचा आवाज दाबण्यासाठी भाजप सरकार असे दडपशाहीचे राजकारण नेहमी करीत आले आहे, असाही आरोप त्यांनी केला.

टॅग्स :Karti Chidambaramकार्ती चिदंबरमcongressकाँग्रेसBJPभाजपा