शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Rain Alert: रेड अलर्ट! महाराष्ट्रातील 'या' जिल्ह्यांना अत्यंत मुसळधार पावसाचा इशारा
2
Lufthansa Flight : 'Lufthansa'च्या विमानाला हैदराबादमध्ये उतरण्याची परवानगी नाकारली, जर्मनीला परतलं; नेमकं प्रकरण काय?
3
Mumbai: गिरगावमध्ये रस्त्याला भगदाड, बेस्ट बस पाच फूट खोल खड्यात, व्हिडीओ बघा
4
डोनाल्ड ट्रम्प यांनी वर्षभरात कमावले ₹५,१०० कोटी, कुठून आला त्यांच्याकडे इतका पैसा?
5
माकडाच्या हाती लागलं नोटांचं बंडल, झाडावर चढून केली ५००-५०० रुपयांच्या नोटांची उधळण, व्हिडीओ व्हायरल
6
इराण-इस्रायल संघर्षामुळे पाकिस्तानवर रडण्याची वेळ! पेट्रोल-डिझेलचे भाव भडकले, काय आहेत दर?
7
तुमच्या अनुभवाचा राज्याला काय उपयोग? कुंडमाळा पूल दुर्घटनेवरुन राज ठाकरेंचा सत्ताधाऱ्यांना सवाल
8
Ritual: अकाली मृत्यू येऊ नये म्हणून रोज झोपण्यापूर्वी करा 'ही' दोन ओळींची प्रार्थना!
9
आमदार, खासदार विकत घ्यायला पैसे आहेत पूल बांधायला नाही? मावळ दुर्घटनेवरुन राऊतांचा सवाल
10
Post Office च्या 'या' स्कीममध्ये हवी तितकी खाती उघडू शकता, हमी परताव्यासह मिळेल Tax मध्येही सूट
11
इंग्लंडविरूद्धच्या टेस्टसाठी शार्दुल ठाकूरला 'प्लेइंग ११'मध्ये संधीची शक्यता, 'या' खेळाडूला डच्चू?
12
Uddhav Thackeray: विधानसभेची चूक पुन्हा करू नका, उद्धव ठाकरेंचा शाखाप्रमुखांना दम!
13
Israel-Iran War : भारताला अडकवण्याचा प्रयत्न करणारा चीनच स्वत:च अडकला, इस्रायलच्या इराणवरील हल्ल्यानं ड्रॅगनलाही फटका
14
"आई कुठे काय करते मला सोडायची नव्हती पण...", संजनाची भूमिका साकारलेल्या दिपाली पानसरेने सांगितलं नेमकं कारण
15
"मंत्रालयातून उडी मारावी लागेल अशी वेळ.."; ज्येष्ठ मराठी अभिनेत्याची बिकट अवस्था, म्हणाला- "वय झाल्यामुळे.."
16
तुमचा पैसा तयार ठेवा! 'या' आठवड्यात ६ नवे IPO बाजारात, बंपर कमाईची संधी?
17
Navi Mumbai Suicide: १२ हजार रुपयांत संपूर्ण कुटुंबाचा खर्च चालवायचा कसा? तरुणीने संपवले जीवन
18
Air India Plane Crash: चित्रपट निर्माता बेपत्ता! विमान पडलेल्या ठिकाणाजवळ मोबाइलचं शेवटचं लोकेशन
19
१०-१५ हजारांत संसाराचा गाडा हाकायचा कसा? राज्यातील शिक्षणसेवकांचा सवाल
20
विशेष लेख: हवाई सुरक्षेबाबत भारत इतका मागास का?

 जम्मूतल्या नेत्यांची नजरकैद संपुष्टात, गांधी जयंतीलाच मोदी सरकारचा मोठा निर्णय 

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 2, 2019 10:47 IST

महात्मा गांधींच्या जयंतीनिमित्त जम्मू-काश्मीर प्रशासनानं जम्मूतल्या काही नेत्यांची नजरकैद संपुष्टात आणली आहे.

जम्मूः महात्मा गांधींच्या जयंतीनिमित्त जम्मू-काश्मीर प्रशासनानं जम्मूतल्या काही नेत्यांची नजरकैद संपुष्टात आणली आहे. कलम 370 हटवल्यानंतर स्थानिक पोलिसांनी सतर्कतेच्या पार्श्वभूमीवर जम्मूतल्या अनेक नेत्यांना नजरकैद केलं होतं. माजी मंत्री आणि डोगरा स्वाभिमान संघटनेचे पक्षाध्यक्ष चौधरी लाल सिंह यांना नजरकैद केलं होतं. जम्मूतल्या सर्वच विरोधी पक्षांच्या नेत्यांची नजरकैद हटवण्यात आली आहे. ज्या नेत्यांवरून नजरकैद हटवण्यात आली आहे, त्यात नॅशनल कॉन्फरन्स, काँग्रेस, पँथर्स पार्टीच्या नेत्यांचा समावेश आहे.चौधरी लाल सिंह यांच्याशिवाय ज्या नेत्यांवरून नजरकैद हटवण्यात आली आहे, त्यात नॅशनल कॉन्फरन्सचे देवेंद्र राणा आणि एसएस सालाथिया, काँग्रेसच्या रमन भल्ला आणि पँथर्स पार्टीचे हर्षदेव सिंह यांच्या नावांचा समावेश आहे. या नेत्यांना 5 ऑगस्टपासून नजरकैदेत ठेवण्यात आलं होतं. केंद्र सरकारने जम्मू-काश्मीरला विशेष दर्जा देणारे कलम 370 रद्द केल्यानंतर मेहबुबा मुफ्ती आणि फारुख अब्दुल्ला यांना नजरकैद केले आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी नॅशनल कॉन्फ्ररन्सच्या खासदारांना फारुख अब्दुल्ला आणि त्यांचे पुत्र व जम्मू-काश्मीरचे माजी मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांना भेटण्यासाठी परवानगी देण्यात आली होती. मात्र, भेट झाल्यानंतर निर्बंधामुळे खासदारांना मीडियासोबत बातचीत करता आली नाही. 

टॅग्स :Jammu Kashmirजम्मू-काश्मीर