हिंदीवर भर देण्याचा मोदी सरकारचा निर्णय

By Admin | Updated: June 20, 2014 02:56 IST2014-06-20T02:56:22+5:302014-06-20T02:56:22+5:30

सर्व सरकारी विभागांमध्ये व सार्वजनिक जीवनात हिंदी भाषेचा वापर वाढविण्यावर भर दिला जाणार असल्याचे संकेत दिले.

Modi government's decision to emphasize on Hindi | हिंदीवर भर देण्याचा मोदी सरकारचा निर्णय

हिंदीवर भर देण्याचा मोदी सरकारचा निर्णय

>नवी दिल्ली : हिंदी भाषा लादली जात असल्याच्या द्रमुकने केंद्रावर केलेल्या आरोपाच्या पाश्र्वभूमीवर केंद्रीय गृहराज्यमंत्री किरण रिजीजू यांनी, सर्व सरकारी विभागांमध्ये व सार्वजनिक जीवनात हिंदी भाषेचा वापर वाढविण्यावर भर दिला जाणार असल्याचे संकेत दिले. हिंदी भाषेचा वापर वाढविणो याचा अर्थ अन्य भाषांना गौण समजणो असाही घेतला जाऊ नये, हेही त्यांनी स्पष्ट केले. 
रिजीजू पुढे म्हणाले, हिंदी आपली राजभाषा असल्याने तिचा वापर वाढविण्याला आम्ही प्राधान्य देणार आहोत. करुणानिधी यांच्या पक्षाने 196क् च्या दशकात तामिळनाडूत हिंदीविरोधी आंदोलन राबविले होते ज्याचा परिणाम म्हणून दाक्षिणात्य भागात हिंदीचा प्रसार होऊ शकला नव्हता. (लोकमत न्यूज नेटवर्क)
 
विकासाकडे अधिक लक्ष द्या, द्रमुकचे केंद्रावर शरसंधान
- चेन्नई- हिंदी भाषेला प्राधान्य दिले जाणार असल्याच्या रालोआ सरकारच्या धोरणावर शरसंधान साधताना द्रमुकचे प्रमुख एम. करुणानिधी यांनी पंतप्रधान मोदी यांनी आर्थिक व सामाजिक विकासाकडे अधिक लक्ष द्यावे, असे सुचविले आहे. हिंदीला प्राधान्य देण्याचा हा निर्णय, बिगरहिंदी भाषक नागरिकांसोबत भेदभाव करणो व त्यांना दुय्यम दर्जा देण्याच्या प्रयत्नातले पहिले पाऊल असल्याचे मानले जाईल.  असे ते म्हणाले.

Web Title: Modi government's decision to emphasize on Hindi