शहरं
Join us  
Trending Stories
1
कर्तृत्वशून्य लोकांकडूनच जाती-धर्माच्या नावे राजकारण केले जाते: नितीन गडकरींचा टोला
2
अजित पवार गटाच्या आमदाराच्या स्वीय्य सहाय्यकाचा भिवंडीजवळ महामार्गवरील अपघातात मृत्यू
3
कोलकाता नाईट रायडर्स अव्वल स्थानी! LSG ला नमवून प्ले ऑफची जागा जवळपास केली पक्की 
4
रक्तानं आपलं चित्र रेखाटणाऱ्या कलाकाराचं आधी फडणवीसांकडून कौतुक अन् नंतर दिला प्रेमळ सल्ला!
5
निवडणूक रोख्यांमुळे पंतप्रधान कार्यालय वसुलीचे कार्यालय बनल्याचे स्पष्ट- प्रकाश आंबेडकर
6
महायुतीचे उमेदवार उज्ज्वल निकम यांच्यासाठी मुलगा अनिकेत निकम यांचा घरोघरी जाऊन प्रचार
7
लोकसभा निवडणुकीतील तिसऱ्या टप्प्याचे मतदान जवळ येताच सोशल मीडियावर रायगड पोलिसांची करडी नजर
8
डॉक्टर प्रविण अग्रवाल विरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल; रुग्ण महिलेसोबत अश्लील वर्तनाचा आरोप
9
अपघात की..? वांद्रे येथे नारळाचे झाड अचानक कोसळले! रिक्षाचालक जखमी, दुकानही जमीनदोस्त
10
मागील दोन महिन्यात झपाट्याने वाढलेल्या सोने-चांदीच्या किंमती घसरल्या, जाणून घ्या भाव
11
ठाण्यात अजब घटना! धक्का लागल्याचा जाब विचारल्याने मद्यपीचा वृद्धावर चाकूने हल्ला
12
धक्कादायक घटना! दहा लाखांमध्ये घराचे आमिष दाखवून एक कोटी ४८ लाखांची फसवणूक
13
Sharad Pawar Health Update: शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम, सभा रद्द! घसा बसला, प्रकृती अस्वास्थ्यामुळे घेतला निर्णय
14
दारूची वाहतूक अन् वाटपावर 'एक्साईज'ची करडी नजर; रात्रंदिवस सोलापुरात पथके राहणार तैनात
15
ठाणे जिल्ह्यातील निवडणूक प्रक्रिया शांततेत पार पाडण्यासाठी गांभीर्यपूर्वक काम करण्याचे अधिकाऱ्यांना धडे
16
कर्तव्यावर असलेले पोलीस अंमलदार ३८ वर्षीय बाळासाहेब नंदुर्गे यांचा पिंपरीत हृदविकाराने मृत्यू
17
रामललाचे दर्शन घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदींचा अयोध्येत रोड शो! रॅलीला आला मोठा जनसमुदाय
18
सोलापुरात भाजपा, काँग्रेस, बसपाच्या  प्रचाराबद्दल आचारसंहिता भंगचे गुन्हे 
19
अजितदादांना वेळ मिळाला, प्रचार फिरवला, 'अजेंडा' दिला; 'सुनेत्रा वहिनीं'ना फायदा होणार?
20
युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांचा रशियाच्या Most Wanted यादीत समावेश; अहवालात करण्यात आलाय दावा

मोदी सरकारचे पुनरागमन अशक्य - शरद पवार

By ऑनलाइन लोकमत | Published: February 10, 2019 5:29 AM

लोकसभा निवडणुकांमध्ये सत्ताधारी आणि विरोधकांना नेमक्या किती जागा मिळतील, या आकड्यांच्या खेळात मी अजिबात पडणार नाही, मात्र नरेंद्र मोदी सरकारचे पुनरागमन शक्य नाही, हा आत्मविश्वास वृद्धिंगत होत चालला आहे.

- सुरेश भटेवरानवी दिल्ली : लोकसभा निवडणुकांमध्ये सत्ताधारी आणि विरोधकांना नेमक्या किती जागा मिळतील, या आकड्यांच्या खेळात मी अजिबात पडणार नाही, मात्र नरेंद्र मोदी सरकारचे पुनरागमन शक्य नाही, हा आत्मविश्वास वृद्धिंगत होत चालला आहे. प्रत्येकाच्या बोलण्यातून मला त्याचा प्रत्यय येत आहे. त्यामुळे लोकसभा निवडणुकांच्या निकालानंतर विरोधकांच्या एकजुटीचे जे चित्र उभे राहील ते अभूतपूर्व असेल, असे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी ‘लोकमत’ला सांगितले.देशपातळीवर विरोधी पक्षांच्या निवडणूकपूर्व महाआघाडीचा आमचा इरादा नाही. प्रत्येक राज्यात मजबूत असलेल्या पक्षाच्या नेतृत्वाखाली अन्य विरोधकांनी एकत्र यावे आणि मोदी सरकारच्या पराभवाचे सूत्र केंद्रस्थानी ठेवून निवडणूक लढवावी. त्यादृष्टीने जागावाटप करावे, असे सूत्र आहे. निवडणुकीच्या निकालानंतर विजयी विरोधकांची महाआघाडी निश्चित लक्षवेधी असेल, असा मला विश्वास आहे, असे सांगताना आताच्या विरोधकांना भाजपापेक्षा अधिक जागा मिळतील, असे संकेत शरद पवार यांनी दिले.कोलकात्यात अलीकडेच झालेल्या ममता बॅनर्जींच्या महारॅलीत २२ विरोधी पक्षाच्या नेत्यांनी हजेरी लावली. लवकरच अजमेर, चंदीगड, भोपाळ, लखनऊ, मेरठ, बंगळुरू, हैदराबाद, अमरावती (आंध्र प्रदेश) चेन्नई व कोची या १० मोठ्या शहरांमध्येही विरोधी पक्षांच्या संयुक्त महारॅलींचे आयोजन केले जाणार आहे, अशी माहितीही पवार यांनी दिली.विरोधकांच्या हक्काचे केंद्रदिल्लीत शरद पवारांचे निवासस्थान, सध्या विरोधकांच्या महाआघाडीचे हक्काचे केंद्र बनले आहे. सर्वांना समजावून घेणारा नेता अशी पवारांची प्रतिमा असल्याने या बंगल्यावरची वर्दळ वाढली आहे. विविध राज्यांतील बहुतांश प्रादेशिक पक्षांच्या नेत्यांची अस्वस्थ पावले त्यांच्याकडे वळतात अन् पवारांशी सल्लामसलत केल्यानंतर काहीशा निर्धास्त मन:स्थितीत ही मंडळी परततात, असे दृश्य आहे.

टॅग्स :Sharad Pawarशरद पवारLok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक २०१९