शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
4
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
5
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
6
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
7
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
8
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
9
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
10
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
11
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
12
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
13
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
14
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
15
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
16
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
17
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
18
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
19
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
20
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
Daily Top 2Weekly Top 5

मोदी सरकारच्या मंत्रिमंडळ विस्ताराला वेग; शिवसेनेने साथ सोडल्याने भाजपा जोडणार 'हा' नवा मित्र

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 13, 2019 09:34 IST

त्याचसोबत पंतप्रधान नरेंद्र मोदी मंत्रिमंडळ विस्तार करुन एनडीएतील घटक पक्षांचं समाधान करण्याच्या तयारीत आहे.

नवी दिल्ली - झारखंड विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी मंत्रिमंडळाचा विस्तार करण्याच्या तयारीत आहेत. या विस्तारात नितीश कुमारांचा जेडीयू पक्षही सहभागी होणार आहे. तर आध्र प्रदेशचे मुख्यमंत्री जगनमोहन रेड्डी यांची वायएसआर काँग्रेस पार्टीलाही एनडीएत सहभागी करुन घेण्याच्या हालचाली सुरु आहेत. याच दरम्यान टीडीपीने नागरिकत्व सुधारणा विधेयकाला पाठिंबा देत भाजपाशी संबंध सुधारण्याचा प्रयत्न केला आहे. मात्र सध्या भाजपा टीडीपीकडे लक्ष देण्यास तयार नाही. 

जेडीयूच्या सूत्रांनुसार मंत्रिमंडळ विस्तारासाठी भाजपाकडून हालचाली सुरु झाल्यात. सरकारमध्ये सहभागी न झाल्याने बिहारमधील जेडीयू-भाजपा युतीबाबत शंका उपस्थित केली जाते. पुढील वर्षी बिहारमध्ये निवडणुका असल्याने अशाप्रकारे वातावरण निर्माण होणे चुकीचं आहे. त्यामुळे मंत्रिमंडळात सहभागी होण्यास जेडीयू तयार झाली आहे. त्याचाच परिणाम म्हणून ज्या नागरिकत्व सुधारणा विधेयकाला जेडीयूने विरोध केला होता तो मावळत त्यांनी विधेयकाला संसदेत पाठिंबा दिला. 

महाराष्ट्रातील सत्ताकारणामुळे शिवसेना एनडीएतून बाहेर पडली असल्याने जेडीयूला अशा परिस्थितीत जास्त आणि महत्त्वाची खाती मिळण्याची शक्यता आहे. भाजपा सूत्रांनुसार वायएसआर काँग्रेस लवकरच एनडीएत सहभागी होईल. यावर बोलणी सुरु आहेत. सरकारने आणलेल्या विधेयकाला वायएसआरने समर्थन केलं. एनडीएचा घटकपक्ष बनल्यानंतर त्यांना सरकारमध्ये जागा देऊ शकतात. वायएसआर आणि भाजपाशी जवळीक वाढल्याने टीडीपी चिंतेत आहे. 

त्याचसोबत पंतप्रधान नरेंद्र मोदी मंत्रिमंडळ विस्तार करुन एनडीएतील घटक पक्षांचं समाधान करण्याच्या तयारीत आहे. तसेच केंद्रीय मंत्री रामविलास पासवान यांच्याजागी त्यांचे पूत्र चिराग यांना मोदी मंत्रिमंडळात सहभागी करु शकतात. चिराग यांना राज्यमंत्रिपदाचा दर्जा मिळेल तर रामविलास पासवान यांना एनडीएचं संयोजक पद देऊन घटकपक्षांमध्ये समन्वय साधण्याचा प्रयत्न करणार आहेत. महाराष्ट्रातील सत्तासंघर्षात शिवसेनेने भाजपाशी फारकत घेतल्याने एनडीएतील घटक पक्षांशी नाराजी समोर आली होती. अधिवशेनापूर्वी झालेल्या एनडीएच्या बैठकीचं निमंत्रणही शिवसेनेला दिलं नव्हतं. या बैठकीत एनडीए घटकपक्षांमध्ये समन्वय साधण्यासाठी संयोजकाची नियुक्ती व्हावी अशी मागणी झाली होती. 

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीBJPभाजपाShiv Senaशिवसेनाministerमंत्री