शहरं
Join us  
Trending Stories
1
विमान अपघातात सापडलेली भगवदगीता, कृष्ण मूर्ती कोणाची? एअर इंडियाची क्रू मेंबर असलेल्या पनवेलच्या लेकीची...
2
आयुष्यात कधीच विमानात बसणार नाही; व्हिडीओ रेकॉर्ड करणाऱ्या आर्यनने घेतली धास्ती, पोलीस चौकशीनंतर...
3
अमेरिकेत मोठी घटना! दोन खासदारांवर घरात घुसून गोळीबार; महिला खासदार, पतीचा मृत्यू
4
नीट-यूजीचा निकाल जाहीर! राजस्थानचा महेश कुमार पहिला, तर महाराष्ट्राचा कृष्णांग जोशी तिसरा
5
एअर इंडियाकडून मदत जाहीर, मृतांच्या नातेवाईकांना २५ लाखांची मदत देणार; टाटा सन्सचेही १ कोटी मिळणार...
6
दुबईतील ६७ मजली गगनचुंबी इमारतीला भीषण आग; ३,८२० रहिवाशांना बाहेर काढले
7
पहिल्या डावात झिरो, तोच फायनलचा हिरो! मार्करम हा शतकातील असा पहिला 'शतकवीर' ज्यानं...
8
उल्हासनगरला पावसाने झोडपले, नाल्यावरील पूल कोसळला 
9
टेम्बा बावुमाच्या कॅप्टन्सीला तोड नाही; आतापर्यंत एक टेस्ट नाही हारला! ऑस्ट्रेलिया तोंड पाडून घरला
10
Ahmedabad Plane Crash : "माणुसकी दाखवा, माझी मुलगी रुग्णालयात..."; विमान अपघातानंतर डॉक्टरची हात जोडून विनंती
11
राज-उद्धव ठाकरे एकत्र आले तर महापालिका निवडणुकीत ५४ टक्के मते मिळतील; सर्व्हे आल्याचा शिवसेना नेत्याचा दावा
12
बलात्कार करणाऱ्याला महिलेने घडवली जन्माची अद्दल; विळ्याने नराधमाचे गुप्तांगच कापले
13
लंच ब्रेक झाला म्हणून २० वर्षीय तरुणी घरी गेली; बेडरुममध्ये तिचा बॉस... 
14
SA Won WTC Final 2025 : 'चोकर्स'चा शिक्का पुसला, द. आफ्रिकेने इतिहास रचला; ऑस्ट्रेलियाला हरवून २७ वर्षांनी जिंकली ICC ट्रॉफी! मार्करमचे धमाकेदार शतक
15
Israel Rran War: 'हल्ले थांबवा नाहीतर तेहरानला आग लावू'; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इराणच्या खोमेनींना इशारा
16
आत्महत्येबाबत इन्स्टावर तरूणाने टाकली पोस्ट; १२ मिनिटांत पोलिसांनी फासावरून खाली उतरवला
17
WTC 2025 Final Prize Money : चांदीची गदा अन् IPL चॅम्पियन्स RCB पेक्षा अधिक रक्कम; दक्षिण आफ्रिकेसह कोणत्या संघाला किती बक्षीस मिळालं?
18
रोज विमाने उडतात, पण या विमानातून आवाजच येत नव्हता...; व्हिडीओ काढणाऱ्या तरुणाच्या काकीला वाटले...
19
इराण-इस्रायल युद्ध लांबलं तर 'या' महत्वाच्या वस्तू महागणार! जाणून घ्या, या देशांकडून काय-काय आयात करतो भारत?
20
Air India Plane Crash: ज्या आगीत जिवंत माणसांची झाली राख, त्यात एकच मानवी अवयव वाचला

सोलर रूफ टॉप योजने संदर्भात मोदी सरकारचा मोठा निर्णय, एक कोटी कुटुंबांना मिळेल मोफत वीज, होईल बंपर कमाई

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 29, 2024 17:14 IST

सोलर प्लांटमधून जी अतिरिक्त वीज निर्माण होईल, ती वीज कंपन्यांना विकूण लोकांना पैसाही कमावता येईल...

केंद्रातील मोदी सरकारने रूफटॉप सोलार स्कीमसाठी 75 हजार कोटी रुपये मंजूर केले आहेत. या योजनेचा फायदा देशभरातील तब्बल एक कोटी कुटुंबांपर्यंत पोहोचविण्याचे सरकारचे लक्ष्य आहे. केंद्रीय मंत्री अनुराग ठाकुर यांनी यासंदर्भात कॅबिनेटच्या बैठकीत घेण्यात आलेल्या निर्णयाची माहिती दिली. ते म्हणाले, 'पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला असून पीएम सूर्य घर मोफत वीज योजनेला मंजुरी देण्यात आली आहे. यामुळे एक कुटुंबांना दर महा 300 युनिट मोफत वीज मिळू शकेल.' या योजनेंतर्गत प्रति एक किलो वॅट सिस्टिमवर प्रत्येक कुटुंबाला 30 हजार रुपयांची सब्सिडी मिळेल. याशिवाय 2 किलोवॅट सिस्टिमअंतर्गत 60 हजार रुपयांची सब्सिडी मिळेल.

या योजनेंतर्गत, कोणतेही कुटुंब नॅशनल पोर्टलला भेट देऊन अनुदानासाठी अर्ज करू शकते आणि रूफटॉप सोलर स्कीमसाठी कुठल्याही विक्रेत्याची निवडू करू शकतात. याशिवाय त्यांना कमी व्याजाने कर्जही मिळू शकते. याच बरोबर, सरकारने प्रत्येक जिल्ह्यात मॉडेल सोलर योजना बनवण्याचा निर्णयही घेतला आहे. यासंदर्भात ग्रामीण भागातील लोकांमध्ये जागरुकता निर्माण  व्हावी, यासाठी या गावांना रोल मॉडेल म्हणून तयार करण्यात येणार आहे. आसंदर्भात अर्थसंकल्पातही घोषणा करण्यात आली होती. 

असा होईल फायदा -1. या योजनेअंतर्गत एक कोटी कुटुंबांना दरमहा 300 युनिट मोफत वीज मिळेल. यामुळे वीजबिलाची बचत होऊन महिन्याला हजारो रुपयांची बचत होईल. 

2. सोलर प्लांटमधून जी अतिरिक्त वीज निर्माण होईल, ती वीज कंपन्यांना विकूण लोकांना पैसाही कमावता येईल.

3. रहिवासी भागात सौरऊर्जा प्रकल्प उभारून 30 GW वीजही तयार होईल.

4. यामुळे कार्बन उत्सर्जनातही पुढील 25 वर्षांत 720 मिलियन टन पर्यंतची घट होईल. 5. या योजनेत मॅन्युफॅक्चरिंग, लॉजिस्टिक, पुरवठा साखळी, विक्री आणि इतर सेवांच्या माध्यमातून 17 लाख एवढा रोजगार तयार होईल.

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीBJPभाजपाCentral Governmentकेंद्र सरकार