शहरं
Join us  
Trending Stories
1
छत्तीसगडमध्ये मोठा एन्काऊंटर! १ कोटीचा इनाम असलेला मोडेम बाळकृष्णसह १० नक्षलवादी ठार 
2
जगातील सर्वात मोठ्या सोने तस्करांपैकी एक नेपाळच्या जेलमधून पळाला; ३८०० किलो सोने...
3
दुपारी आनंदानं बहिणीशी बोलली अन् संध्याकाळी सगळं संपवलं! जळगावच्या नवविवाहितेनं उचललं टोकाचं पाऊल
4
'आमच्या जीआरला हात लावला तर ओबीसी आरक्षणालाही कोर्टात आव्हान देऊ'; जरांगेंचा इशारा
5
आप खासदार संजय सिंह जम्मू-काश्मीरमध्ये नजरकैदेत; अरविंद केजरीवालांचा भाजपवर निशाणा...
6
नेपाळमधील वाद थांबेना, आता एकमेकांशी भिडले आंदोलकांचे दोन गट, समोर आलं असं कारण
7
बाजारात सलग सातव्या दिवशी तेजी; निफ्टी २५,००० च्या पुढे, सेन्सेक्सही विक्रमी पातळीवर; 'या' क्षेत्रात मोठी वाढ
8
जिंकलंस भावा! जवानाने आई-वडिलांचा 'असा' केला मोठा सन्मान; Video पाहून म्हणाल 'एक नंबर'
9
बीडमध्ये २३ दिवसांत तीन सरकारी अधिकाऱ्यांचा मृत्यू; आता विस्तार अधिकाऱ्याने संपवले जीवन
10
सीपी राधाकृष्णन यांचा महाराष्ट्राच्या राज्यपालपदाचा राजीनामा, आता गुजरातच्या राज्यपालांकडे जबाबदारी
11
बुध गोचर २०२५: १५ सप्टेंबरपासून 'या' ५ राशींचे उजळणार भाग्य; बुध गोचर, भद्रा राजयोगात लाभाच्या संधी
12
ना लग्न, ना पार्टनर, तरी आई बनली ही भारतीय गायिका, घेतला धाडसी निर्णय, कोण आहे ती?
13
राज्यातील या शहरात सुरु झाली अ‍ॅमेझॉन नाऊ सर्व्हिस; १० मिनिटांत वस्तू पोहोचविणार...
14
९ मुलं, २ सुना अन् ३२ वर्षांचा भरला संसार! सगळं क्षणात सोडून प्रियकरासोबत पसार झाली महिला
15
नेपाळच्या पंतप्रधानपदाच्या शर्यतीत सगळ्यात पुढे, जेन-झीचेही लाडके! कोण आहेत कुलमान घिसिंग?
16
"ते न सांगता बाहेर जातात, अन्..."; राहुल गांधींविरोधात मल्लिकार्जुन खरगेंना कुणी लिहिलं पत्र?
17
मनसेसोबत युतीसाठी उद्धव ठाकरेंची मविआतून बाहेर पडण्याची तयारी?; बाळा नांदगावकरांचं सूचक विधान
18
Pitru Paksha 2025: दक्षिणेला श्राद्ध केले जाते, पण शुभ कार्य नाही; मात्र शिवलिंगाची दिशा तीच!!
19
कोल्हापूरच्या पठ्ठ्याने बनवले भारी AI टूल; डेटा सायंटिस्टस, ॲनालिस्ट्स यांना होणार फायदा
20
"माझे आईबाबा शेतकरी आहेत, त्यामुळे...", ललित प्रभाकरने सांगितला कुटुंबाचा संघर्षकाळ

लाखो घरखरेदीदारांचं स्वप्न होणार साकार, अपूर्ण प्रोजेक्टला निधी देणार मोदी सरकार

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 14, 2019 21:12 IST

मंदीच्या विळख्यात सापडलेल्या भारतीय अर्थव्यवस्थेला नवसंजीवनी देण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारकडून गेल्या काही दिवसांपासून ‘बूस्टर डोस’ देण्याचा प्रयत्न सुरु आहे.

नवी दिल्ली - देशातील आर्थिक स्थिती ढासाळली असून मंदीचे सावट देशावर आहे. रियल इस्टेटच्या क्षेत्रातही या मंदीचा परिणाम दिसून येत आहे. या सेक्टरला प्रोत्साहन देण्यासाठी अर्थमंत्री निर्मला सितारमण यांनी शनिवारी मोठी घोषणा केली. बांधकाम क्षेत्रातील ज्या प्रकल्पांमध्ये 60 टक्के काम झाले आहे, त्या प्रकल्पांसाठी सरकारने 10 हजार कोटींचा फंड देण्याचं ठरवलंय, असे सितारमण यांनी सांगितले. त्यासाठी एक अटक घालण्यात आली आहे. 

मंदीच्या विळख्यात सापडलेल्या भारतीय अर्थव्यवस्थेला नवसंजीवनी देण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारकडून गेल्या काही दिवसांपासून ‘बूस्टर डोस’ देण्याचा प्रयत्न सुरु आहे. आर्थिक मंदीवरुन मोदी सरकारवर विरोधकांकडून टीकेची झोडही उडवली जात आहे. त्यामुळे मंदीतून बाहेर पडण्यासाठी मोदी सरकारकडून अर्थव्यवस्थेशी निगडीत सवलतींच्या घोषणा करण्यात येत आहेत. अर्थमंत्री निर्मला सितारामण यांनी आज दुपारी दिल्लीतील नॅशनल मीडिया सेंटरमध्ये पत्रकार परिषद घेत निर्यात आणि रिअल इस्टेटसंदर्भात महत्त्वाच्या घोषणा केल्या आहेत. तसेच, छोट्या करदात्यांसाठी मोठा दिलासा दिला असून आता छोट्या डिफॉल्टमध्ये आता फौजदारी खटला चालणार नाही. 25 लाखांपर्यंत टॅक्स डिफॉल्टर्सवर कारवाई करण्यासाठी वरिष्ठ अधिकाऱ्यांची मंजूरी घेणे आवश्यक आहे. तसेच, बांधकाम क्षेत्रातील ज्या प्रकल्पांमध्ये 60 टक्के काम झाले आहे, त्या प्रकल्पांसाठी सरकारने 10 हजार कोटींचा फंड देण्याचं ठरवलंय, असे सितारमण यांनी सांगितले. त्यासाठी एक अटक घालण्यात आली आहे. 

केवळ, नॉन परफॉर्मिंग असेट म्हणजेच, एनपीए प्रल्पांना याचा फायदा होणार आहे. नेशनल कंपनी लॉ ट्राइब्यूनल (एनसीएलटी) कडे ज्या प्रकल्पांचे प्रकरण पोहोचले आहे, त्यांना या योजना निधीचा लाभ होणार नाही. देशातील 3.5 लाख घरांना याचा फायदा होईल, असे सितारमण यांनी स्पष्ट केले. सरकारच्या या घोषणेमुळे दिल्ली एनसीआरमध्ये आपल्या घराची प्रतिक्षा पाहणाऱ्या लाखो नागिरकांना याचा लाभ मिळणार आहे. सरकारने निधी पुरविल्यामुळे अनेक प्रकल्प पूर्ण होतील. तसेच, घर खरेदी करणाऱ्यांना लवकरच घराचा ताबा मिळेल. घर खरेदी करणाऱ्यांना सहजच गृहकर्ज उपलब्ध करुन देण्यात येणार आहे.   

टॅग्स :Nirmala Sitaramanनिर्मला सीतारामनHomeघरReal Estateबांधकाम उद्योगdelhiदिल्लीNCRराष्ट्रीय राजधानी क्षेत्र