नवी दिल्ली: कोरोनामुळे मृत पावलेल्यांची संख्या ४ वर पोहोचल्यानंतर आता मोदी सरकारनं महत्त्वाची पावलं उचलण्यास सुरुवात केलीय. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी केंद्रानं आज सहा मोठे निर्णय घेतले. कोरोनामुळे आज पंजाबमध्ये मृत्यूमुखी पडलेल्या व्यक्तीचं वय ७२ वर्ष इतकं आहे. देशात आतापर्यंत कोरोनामुळे मृत पावलेल्या व्यक्तींचं वयोमान ६० पेक्षा अधिक आहे. या पार्श्वभूमीवर ६५ वर्षांपेक्षा अधिक वय असलेल्या व्यक्तींनी घराबाहेर पडू नये, अशा सूचना केंद्राकडून देण्यात आल्या आहेत. याशिवाय विमान सेवेवरही कठोर निर्बंध लादण्यात आले आहेत.कोरोनामुळे मृत पावलेल्या व्यक्तींचं वय ६० हून अधिक आहे. त्यामुळेच ६५ पेक्षा अधिक वयाच्या व्यक्तींनी घराबाहेर पडू नये, असे आदेश केंद्रानं दिले आहेत. याशिवाय १० वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांनीदेखील घरीच राहावं, अशा सूचना केंद्राकडून देण्यात आल्या आहेत. लहान मुलांची आणि ज्येष्ठांची रोगप्रतिकार क्षमता कमी असल्यानं हा निर्णय घेण्यात आलाय. रेल्वे आणि विमान प्रवासादरम्यान मिळणाऱ्या सर्व सवलती रद् करण्यात आल्या आहेत. मात्र विद्यार्थी, रुग्ण आणि दिव्यांगांना यामधून वगळण्यात आलंय.
Coronavirus: कोरोनाला रोखण्यासाठी केंद्र सरकारचे सहा मोठे निर्णय; नागरिकांसाठी दोन महत्त्वाच्या सूचना
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 19, 2020 18:46 IST
Coronavirus: कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी मोदी सरकारचे महत्त्वपूर्ण निर्णय
Coronavirus: कोरोनाला रोखण्यासाठी केंद्र सरकारचे सहा मोठे निर्णय; नागरिकांसाठी दोन महत्त्वाच्या सूचना
ठळक मुद्दे१० वर्षांखालील, ६५ वर्षांवरील व्यक्तींनी घराबाहेर पडू नये२२ मार्चनंतर आठवडाभर एकही विमान परदेशातून भारतात उतरणार नाहीकोरोनाला रोखण्यासाठी केंद्र सरकारच्या महत्त्वाच्या सूचना