शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
होर्मुजच्या समुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
3
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
4
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
5
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
6
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
7
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
8
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
9
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
10
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
11
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
12
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
13
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
14
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
15
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
16
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
17
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
18
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
19
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
Daily Top 2Weekly Top 5

मोदी सरकार गेम चेंजर नाही, नुसतेच नेम चेंजर, काँग्रेसची घणाघाती टीका

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 5, 2018 20:38 IST

केंद्रातील सत्ताधारी भाजपावर काँग्रेसने घणाघाती टीका केली आहे. संसदेतील राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील आभार प्रस्तावावर चर्चा करताना राज्यसभेतील विरोधी पक्षनेते गुलाम नबी आझाद यांनी भाजपावर जोरदार निशाणा साधला.

नवी दिल्ली - केंद्रातील सत्ताधारी भाजपावर काँग्रेसने घणाघाती टीका केली आहे. संसदेतील राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील आभार प्रस्तावावर चर्चा करताना राज्यसभेतील विरोधी पक्षनेते गुलाम नबी आझाद यांनी भाजपावर जोरदार निशाणा साधला. हे सरकार गेम चेंजर नव्हे तर नुसतेच नेम चेंजर आहे. हे सरकार यूपीए सरकारच्या काळातील योजनांचीच नावे बदलवून स्वत:चे कौतुक करवून घेत आहे, असा टोला त्यांनी लगावला.  आपल्या भाषणात गुलाम नबी आझाद म्हणाले, " 1985 आणि त्यानंतर काँग्रेस आणि यूपीए सरकारच्या कार्यकाळात जेवढ्या जोयना आल्या त्यांचेच नाव बदलून त्या योजना नव्याने सुरू करण्यात येत आहे. तुम्ही  प्रत्येक योजना सुरू करताना सांगता की  आमचे सरकार गेम चेंजर आहे. मात्र तसे काही नसून, हे सरकार केवळ नेम चेंजर आहे."यावेळी आझाद यांनी विविध योजनांचा उल्लेख केला, "स्वच्छ भारत स्वच्छ भारत, जनधन योजना, स्किल इंडिया यांसारख्या अनेक योजना काँग्रेसच्या कार्यकाळात सुरू झाल्या. आता केवळ त्यांचे नाव बदलण्यात आले आहे. मी आधीच सांगितले होते की, पूर्ण पाच वर्षांच्या कार्यकाळात जरी तुमचे सरकार उदघाटन करत राहिले तरी यूपीएच्या सगळ्या योजनांचे उदघाटन करू शकणार नाही, असे मी आधीच सांगितले होते आणि आज तेच घडत आहे."भाषणादरम्यान आझाद यांनी हल्लीच समोर आलेल्या 8  महिन्यांच्या मुलीवरील बलात्काराच्या घटनेचा उल्लेख केला. जर सरकार असा नवा भारत घडवत असेल तर आम्हाला हा असा भारत नको आहे. आम्हाला आमचा जुना भारत परत द्या. सध्या सत्तेवर असलेले भाजपा सरकार हे गेल्या 70 वर्षांमधील सर्वात कमकुवत सरकार असल्याची टीकाही त्यांनी केली. हे सरकार विरोधी पक्षाच्या नेत्यांचे फोन टॅप करत आहे. सगळीकडे संशयाचे वातावरण आहे. या सरकारने जणू सगळ्या विरोधी पक्षांनाच दहशतवादी मानले आहे, असा टोलाही त्यांनी यावेळी लगावला.   

टॅग्स :Indian National Congressइंडियन नॅशनल काँग्रेसBJPभाजपाGovernmentसरकारNarendra Modiनरेंद्र मोदी