शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
4
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
7
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
8
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
9
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
10
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
11
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
12
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
13
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
14
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
15
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
16
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
17
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
18
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
19
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
20
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
Daily Top 2Weekly Top 5

मोदी सरकार लवकरच तुमच्या पैशाचं 'सोनं' करणार?

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 27, 2018 12:35 IST

जन-धननंतर आता सरकार नवी योजना आणण्याच्या विचारात

मुंबई: बँकिंग व्यवस्थेबाहेर असलेल्या नागरिकांना या व्यवस्थेत सहभागी करुन घेण्यासाठी मोदी सरकारनं जन-धन योजना आणली होती. आता मोदी सरकारकडून नवं बँक खातं आणलं जाऊ शकतं. सर्वसामान्य नागरिकांना कोणत्याही बँकेत जाऊन हे नवं खातं सुरू करता येईल. या खात्यावर ग्राहकांना बचत खात्याप्रमाणेच व्याज मिळेल. मात्र बचत खातं आणि या नव्या खात्यात एक मोठा फरक असेल. नीती आयोगानं अर्थ मंत्रालयाला गोल्ड सेविंग्स अकाऊंट व्यवस्था सुरू करण्याचा प्रस्ताव दिला आहे. यावर अर्थ मंत्रालय गंभीरपणे विचार करतं आहे. या नव्या खात्यात ग्राहक सामान्य खात्यासारखेच पैसे भरू शकतात. मात्र त्यांच्या पासबुकवर पैशांची एंट्री होणार नाही. या नव्या खात्यात पैशांऐवजी बँकेच्या पासबुकवर सोन्याची नोंद होईल. उदाहरणार्थ, 10 ग्रॅम सोन्याचं बाजारमूल्य 30 हजार असताना एखाद्या व्यक्तीनं त्याच्या खात्यात 15 हजार रुपये जमा केल्यास त्याच्या पासबुकमध्ये 5 ग्रॅम सोन्याची एंट्री होईल. विशेष म्हणजे या खात्यातून तुम्हाला पैसे आणि सोनं काढण्याचे पर्याय मिळू शकतात. नीती आयोगानं याबद्दलची माहिती अर्थ मंत्रालयाला दिलेल्या प्रस्तावात दिली आहे. त्यामुळे जर तुमच्या खात्यात 30 हजार रुपयांचं सोनं असल्यास, तुम्ही बाजारभावानुसार तितक्या किमतीचं सोनं किंवा रोख रक्कम काढू शकता. मात्र त्यावेळी बँकेकडे तितकं सोनं उपलब्ध असायला हवं. अन्यथा बँक तुम्हाला रोख रक्कम देऊ शकते.  

टॅग्स :GoldसोनंNarendra Modiनरेंद्र मोदीbankबँकBanking Sectorबँकिंग क्षेत्र