शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
3
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
4
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
5
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
6
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
7
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
8
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
9
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
10
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
11
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
12
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
13
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
14
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
15
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
16
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
17
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
18
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
19
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
20
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
Daily Top 2Weekly Top 5

Video - मोदी सरकारच्या मंत्र्याला लिहिता आलं नाही 'बेटी बचाओ, बेटी पढाओ'; झालं असं काही...

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 19, 2024 16:15 IST

Savitri Thakur : सावित्री ठाकूर स्वतः 12वी पास आहेत आणि त्यांना एका बोर्डवर 'बेटी बचाओ, बेटी पढाओ' असं लिहायचं होतं, पण त्या नीट लिहू शकल्या नाहीत.

स्कूल चलें हम अभियानांतर्गत केंद्रीय महिला आणि बालविकास राज्यमंत्री सावित्री ठाकूर मध्य प्रदेशातील धार जिल्ह्यातील ब्रह्मकुंडी येथील सरकारी शाळेत पोहोचल्या होत्या. मिळालेल्या माहितीनुसार, सावित्री ठाकूर स्वतः 12वी पास आहेत आणि यादरम्यान त्यांना एका बोर्डवर 'बेटी बचाओ, बेटी पढाओ' असं लिहायचं होतं, पण त्या नीट लिहू शकल्या नाहीत. त्याऐवजी त्यांनी 'बेढी पड़ाओ बच्चाव' असं लिहिलं. याचा व्हिडीओ आता सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे.

काँग्रेसनेही या घटनेचा समाचार घेत खिल्ली उडवली. मध्य प्रदेशातील धार जिल्ह्यात ही घटना घडली. शिक्षण जागृती मोहिमेचा एक भाग म्हणून सावित्री ठाकूर यांना एका बोर्डवर 'बेटी बचाओ बेटी पढाओ' चा नारा लिहायचा होता. त्या लिहित असताना त्यांनी चुका केल्या. याचाच व्हिडीओ आता व्हायरल होत आहे. 

काँग्रेसचे प्रवक्ते केके मिश्रा यांनी या घटनेवरून जोरदार हल्लाबोल केला आहे. आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबत ट्विट केलं आहे. "याला देशाचं दुर्दैव समजायचं की लोकशाहीचा नाईलाज. देशाचं संविधान की आपलं शिक्षण धोरण यासाठी जबाबदार आहे" असं म्हटलं  आहे. या टीकेनंतर भाजपानेही प्रत्युत्तर दिलं आहे.

भाजपाचे प्रवक्ते डॉ. हितेश बाजपेयी यांनी ट्विटरवर प्रतिक्रिया दिली आहे. "काँग्रेसच्या राजवटीत आदिवासी मुली कोणत्या परिस्थितीत शिक्षण घेऊ शकल्या याचा विचार करा! जे काही तुमच्या राहुल यांना करता आलं नाही, ते या गरीब आदिवासी कुटुंबातील मुलीने करून दाखवलं. इतकंच नाही तर बारावीपर्यंत कठीण आणि गरीब परिस्थितीत शिक्षण घेतल्यानंतर त्या भाजपाच्या महिला बालविकास मंत्री झाल्या."

"त्यांच्यासारखं कठीण जीवन जगणाऱ्या सर्व मुलींना मदत करेन, अशी शपथ घेतली. तुम्ही आणि काँग्रेसने तर आदिवासी महिलांचा अपमान करण्याती शपथच घेतली आहे पंडितजी. हा देश आणि समाज तुमच्या गरीब आणि महिलाविरोधी मानसिकतेला कधीच माफ करणार नाही. आदिवासी कुटुंबात मुलगी म्हणून जन्माला आलात तरच हे समजेल" असं म्हटलं आहे.  

टॅग्स :BJPभाजपाMadhya Pradeshमध्य प्रदेशcongressकाँग्रेस