शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
3
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
4
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
5
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
6
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
7
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
8
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
9
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
10
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
11
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
12
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
13
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
14
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
15
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
16
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
17
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
18
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
19
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
20
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
Daily Top 2Weekly Top 5

शेतातून सत्तेचा मार्ग! लोकसभेच्या परीक्षेसाठी मोदी सरकारचा 'तेलंगणा पॅटर्न'

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 15, 2019 10:05 IST

शेतकऱ्यांची नाराजी दूर करण्यासाठी नवी योजना आणण्याचा विचार

हैदराबाद: हिंदी पट्ट्यातील तीन राज्यांमध्ये शेतकऱ्यांच्या नाराजीचा फटका बसल्यानंतर आता मोदी सरकार नवी योजना लागू करण्याच्या विचारात आहे. शेतकऱ्यांना एकरामागे काही ठराविक रक्कम देण्याचा विचार सरकारकडून सुरू आहे. नोटाबंदी, जीएसटी, दुष्काळामुळे शेतकरी काहीशा अडचणीत सापडला आहे. त्यामुळे बळीराजाला दिलासा देऊन शेतातून सत्तेत जाण्याची योजना मोदी सरकारकडून आखली जात आहेत. विशेष म्हणजे या योजनेची प्रेरणा केंद्र सरकारला तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांच्याकडून मिळाली आहे.गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये दिल्लीत देशभरातील शेतकऱ्यांनी आंदोलन केलं होतं. मात्र यामध्ये तेलंगणाच्या शेतकऱ्यांचा सहभाग नव्हता. तेलंगणातील केसीआर सरकारनं 'रयत बंधू' योजना राबवल्यानं शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला होता. याच योजनेच्या जोरावर केसीआर यांनी तेलंगणातील दणदणीत विजयासह पुन्हा सत्ता मिळवली. मात्र याचवेळी भाजपाला छत्तीसगड, राजस्थान, मध्य प्रदेशातील सत्ता गमवावी लागली. आगामी निवडणूक जिंकून सत्ता राखण्यासाठी मोदी सरकार सध्या केसीआर यांनी राबवलेल्या योजनेचा गंभीरपणे विचार करत आहे. 2018 मध्ये केसीआर यांनी रयत बंधू योजना राबवली. शेतकऱ्यांना थेट रोख रकमेच्या माध्यमातून मदत करणारी ही देशातील पहिलीच योजना होती. याचा फायदा तेलंगणातील 57 लाख शेतकऱ्यांना झाला. या योजनेच्या माध्यमातून पेरणीचा हंगाम सुरू होताच शेतकऱ्याला एकरी 4 हजार रुपये देण्यात आले. विशेष म्हणजे ही मदत मिळवण्यासाठी पीक घ्यायलाच हवं, अशी अट नव्हती. या योजनेमुळे शेतकऱ्याला वर्षभरात एकरामागे 8 हजार रुपये मिळाले. यामुळे तेलंगणाच्या तिजोरीवर जवळपास 10 हजार कोटी रुपयांचा बोजा पडला. 

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीFarmerशेतकरीTelanganaतेलंगणा