शहरं
Join us  
Trending Stories
1
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
2
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
3
“सामाजिक समता प्रस्थापित करण्याच्या दिशेने जातिनिहाय जनगणनेचा निर्णय महत्त्वाचा”: अजित पवार
4
वेळ वाया घालवू नका, थेट कारवाई करा; पहलगाम हल्याबाबत राहुल गांधींची सरकारला मागणी
5
केवळ अजित पवारच नव्हे, शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडूनही मोदी सरकारच्या निर्णयाचं स्वागत
6
जातनिहाय जनगणना; अमित शाह म्हणाले ऐतिहासिक निर्णय, ओवेसी म्हणाले भाजपनं दलित मुस्लिमांसाठी...'
7
“सर्वच प्रश्न सुटतील, योग्य न्याय मिळेल”; जातिनिहाय जनगणना निर्णयाचे छगन भुजबळांकडून स्वागत
8
पुढच्या हंगामात खेळणार का? MS धोनीनं प्रश्न विचारणाऱ्या डॅनी मॉरिसनचीच घेतली फिरकी (VIDEO)
9
दुकानदाराच्या डोळ्यात मिरची पूड टाकून ५० हजार रुपये लुटले, संपूर्ण प्रकार कॅमेऱ्यात कैद!
10
केंद्र सरकारने अचानक जातीय जनगणनेचा निर्णय का घेतला? काँग्रेसचा सवाल...
11
“शेतकऱ्यांना विमा कवच आवश्यक, नवा पॅटर्न अन्यायकारक, योजना पहिल्यासारखी सुरु ठेवा”: सपकाळ
12
गुरुवारी विनायक चतुर्थी: ५ मिनिटे लागतील, स्वामी-बाप्पा कृपा करतील; ‘हे’ मंत्र-श्लोक म्हणाच
13
BREAKING: देशात जातिनिहाय जनगणना होणार; केंद्रातील मोदी सरकारचा मोठा निर्णय
14
Maharashtra Day 2025 Wishes: महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा द्या 'या' स्फूर्तिदायी काव्यरचनांमधून, शेअर करा सुंदर शुभेच्छापत्रं!
15
"CSKला धोनीची गरज नाही, संघाच्या भविष्यासाठी..."; MSD ज्याला आदर्श मानतो, त्यानेच मांडलं रोखठोक मत
16
विनायक चतुर्थी: गणपती पूजनात ‘या’ गोष्टी हव्यातच, कसे कराल व्रत? पाहा, सोपी पद्धत अन् मान्यता
17
विनायक चतुर्थी: ६ राशींना अनुकूल, अडकलेले पैसे मिळतील; नोकरीत पदोन्नती, बाप्पा चांगलेच करेल!
18
"PM मोदींना लष्कराला फ्री हॅन्ड देण्याचा अधिकारच नाही, तो तर..."; प्रकाश आंबेडकरांचं थेट कायद्यावर बोट
19
IPL 2025 : कुलदीप-रिंकू यांच्यात नेमकं काय घडलं? खरी गोष्ट आली समोर (VIDEO)

Modi Government: पुढील महिन्यात मोदी मंत्रिमंडळात मोठे फेरबदल, निवडणुका असलेल्या राज्यांतील चेहऱ्यांना संधी देणार; १२ मंत्र्यांना डच्चू

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 16, 2023 07:46 IST

Modi Government Cabinet Expansion: सरकारच्या नवव्या  वर्षपूर्तीपूर्वी मे महिन्यात मोदी सरकारच्या मंत्रिमंडळात फेरबदल होतील, अशी माहिती सूत्रांनी दिली. यात १२ पेक्षा अधिक केंद्रीय मंत्र्यांना डच्चू मिळण्याची शक्यता आहे.

नवी दिल्ली : सरकारच्या नवव्या  वर्षपूर्तीपूर्वी मे महिन्यात मोदी सरकारच्या मंत्रिमंडळात फेरबदल होतील, अशी माहिती सूत्रांनी दिली. यात १२ पेक्षा अधिक केंद्रीय मंत्र्यांना डच्चू मिळण्याची शक्यता आहे. २०२४ च्या सार्वत्रिक निवडणुका लक्षात घेऊन हा फेरबदल केला जाईल. ऑगस्ट २०२२ पासून पुढे ढकलला फेरबदल अखेर पुढील महिन्यात होण्याची शक्यता आहे. 

सरकारमधून बाहेरचा रस्ता दाखविण्यात येणाऱ्यांसाठी वयाची गाइडलाइन तयार होत आहे. ज्यांचे वय ६५ ते ७०च्या आसपास आहे, त्यांना राजीनामा देण्यास सांगितले जाऊ शकते. कामगिरीच्या आधारावरही काही मंत्र्यांना डच्चू दिला जाईल. काही जणांवर २०२४ मधील निवडणुकीची जबाबदारी सोपवली जाऊ शकते. नव्या मंत्र्यांचा आधार निखळपणे २०२४ च्या सार्वत्रिक निवडणुका आणि किंवा नोव्हेंबरमध्ये होणाऱ्या पाच राज्यांतील विधानसभा निवडणुकांतील गरज पाहून असेल. पश्चिम बंगाल, तेलंगणा, राजस्थान, मध्य प्रदेश, छत्तीसगडसारख्या राज्यांतील नेत्यांना मोदी मंत्रिमंडळात स्थान मिळू शकते. 

महाराष्ट्र, बिहारमधून कुणाची चर्चा? २०२४ च्या निवडणुका लक्षात घेता बिहार व महाराष्ट्रातील नेत्यांनाही मंत्रिमंडळात स्थान मिळू शकते. यात बिहारमधून चिराग पासवान, आरसीपी सिंह यांच्या नावांची तर महाराष्ट्रातून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे तीन केंद्रीय मंत्री केले जाण्याची चर्चा सुरू आहे. एक कॅबिनेट व दोन राज्यमंत्री पदे शिंदे यांच्या शिवसेनेला दिली जाऊ शकतात.

मंत्र्यांची खातीही बदलणार- सूत्रांनी सांगितले की, सुमारे २० केंद्रीय मंत्र्यांच्या खात्यांमध्येही बदल होऊ शकतो. सध्या अनेक केंद्रीय मंत्र्यांकडे एकपेक्षा जास्त मंत्रालयांचे कामकाज आहे. - यात अनुराग ठाकूर, पीयूष गोयल, प्रल्हाद जोशी, भूपेंद्र यादव, मनसुख मंडविया, धर्मेंद्र प्रधान यांचा समावेश आहे. यांच्याकडे सध्या एकापेक्षा जास्त मंत्रालयांची जबाबदारी आहे. यापैकी अनेक मंत्री आगामी लोकसभा निवडणूक लढविणार असून, यासाठी त्यांना पुरेसा वेळ मिळत नाही.

राज्यसभेतील काहींना लोकसभा लढण्याचे निर्देशसरकारमधील सूत्रांचे म्हणणे आहे की, २०२४ मध्ये मोदी सरकारच्या राज्यसभेतील काही वरिष्ठ केंद्रीय मंत्र्यांनाही लोकसभा निवडणूक लढण्याचे निर्देश आतापासून दिले आहेत. यात धर्मेंद्र प्रधान, पीयूष गोयल, भूपेंद्र यादव यांच्यासारखे असे सांगितले जाऊ शकते. यातील काही नेत्यांनी तर आपल्यासाठी लोकसभा मतदारसंघाचा शोधही पूर्ण केला आहे. 

टॅग्स :Central Governmentकेंद्र सरकारBJPभाजपा