शहरं
Join us  
Trending Stories
1
हे काका-काकूंचे घर! ऐन मतदानाच्या दिवशीच अजित पवारांच्या घरी का गेला? सुप्रिया सुळेंनी सांगितले कारण
2
“संभ्रम निर्माण करण्यासाठी ही भेट आहे का?”; अमोल मिटकरींचा सुप्रिया सुळेंना थेट सवाल
3
दत्ता भरणेंच्या अडचणीत वाढ; सुप्रिया सुळेंकडून निवडणूक आयोगाकडे तक्रार!
4
Baramati Lok Sabha Election 2024 : 'अजित पवार शब्दांचा पक्का, शब्द राखेल अशी आशा'; मिशी काढण्यावरून श्रीनिवास पवारांनी पुन्हा डिवचलं
5
"वातावरण खूप चांगले आहे, आम्ही २५-२६ जागा जिंकू", मतदानानंतर बीएस येडियुरप्पांचा दावा
6
"हॅलो! मी CBI अधिकारी बोलतोय, तुमचा मुलगा..."; स्कॅमर्स 'असं' अडकवतात जाळ्यात
7
मुस्लिमांना पूर्ण आरक्षण मिळायलाच हवे; लालू प्रसाद यादव यांचं मोठं विधान
8
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates : देशभरात ११ वाजेपर्यंत २४ टक्के मतदान; महाराष्ट्रात प्रमाण सर्वात कमी
9
“आमच्यासोबत होते म्हणून १८ जागा आल्या, आता काहीच येणार नाही”; भाजपाची ठाकरे गटावर टीका
10
Video - "आमचा उमेदवार चोरीला गेला..."; माजी मंत्र्यांनी जनतेला केलं 'हे' आवाहन
11
बारामतीत नवा ट्विस्ट..! ऐन मतदानाच्या दिवशी सुप्रिया सुळे अजित पवारांच्या घरी दाखल
12
मतदानादरम्यान किरण सामंत नॉट रिचेबल, कार्यकर्ते संभ्रमात, रत्नागिरी-सिंधुदुर्गमध्ये मोठा ट्विस्ट
13
"मराठी 'not welcome' म्हणणाऱ्यांना मत देऊ नका", गुजराती HRच्या पोस्टनंतर रेणुका शहाणेंचं ट्वीट
14
ना पत्नी, ना मुलबाळ! सलमान खानच्या पश्चात कोण होणार त्याच्या संपत्तीचा वारसदार? नाव आलं समोर
15
‘रामगोपाल यादव यांचा राम मंदिराबाबत वादग्रस्त दावा, म्हणाले, हे मंदिर बेकार, त्याचा…’
16
अक्षय्य तृतीया का साजरी केली जाते? या दिवसाचे महत्त्व, महात्म्य अन् काही मान्यता जाणून घ्या
17
Akhilesh Yadav : "भाजपावाले जाणूनबुजून उन्हाळ्यात मतदान ठेवतात"; अखिलेश यादव यांचा आरोप
18
सांगली जिल्हा विशाल पाटील यांच्या घरासाठी जन्माला आलेला नाही; संजयकाका पाटलांचा हल्लाबोल
19
झारखंडचे मंत्री आलमगीर यांचे स्वीय सहायक आणि नोकराला ईडीने केली अटक; 35 कोटी जप्त
20
अक्षय्य तृतीया: ‘ही’ कामे अवश्य करा, सुख-समृद्धी मिळवा; लक्ष्मीकृपेने भरभराट, धनलाभ योग!

मोदी सरकारमुळे अर्थव्यवस्था विस्कटली, मनमोहन सिंग यांचा घणाघाती आरोप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 19, 2018 2:07 AM

नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारने अर्थव्यवस्थेत गोंधळ घालून ठेवला. अर्थव्यवस्थेची घडी पूर्णपणे विस्कटून टाकली आहे. दोन कोटी रोजगारांची निर्मिती व शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्यासारखी पोकळ स्वप्ने दाखवण्याचे काम केले, अशा शब्दांत माजी पंतप्रधान मनमोहनसिंग यांनी सरकारवर हल्ला केला.

- शीलेश शर्मानवी दिल्ली : नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारने अर्थव्यवस्थेत गोंधळ घालून ठेवला. अर्थव्यवस्थेची घडी पूर्णपणे विस्कटून टाकली आहे. दोन कोटी रोजगारांची निर्मिती व शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्यासारखी पोकळ स्वप्ने दाखवण्याचे काम केले, अशा शब्दांत माजी पंतप्रधान मनमोहनसिंग यांनी सरकारवर हल्ला केला.काँग्रेसच्या ८४ व्या खुल्या अधिवेशनात रविवारी भाजपच्या नेतृत्वाखालील सरकारवर मनमोहन सिंग यांनी टीका केली. मोदी सरकार जे काही आश्वासने देत आहे, ते ‘मुंगेरीलाल के हसीं सपने’ यापेक्षा कमी नाहीत. शिक्षण, आरोग्य, शेती, रोजगार आणि प्रत्यक्ष कृषि विकास दर अशा अनेक समस्या आज अर्थव्यवस्थेसमोर आ वासून उभ्या आहेत, त्याकडे मात्र सध्याचे सरकार दुर्लक्ष करत आहे, असा टोलाही डॉ. सिंग यांनी लगावला.आज आपल्यासमोर संधी आहेत, तशीच आव्हानेही आहेत. पण आव्हानांचा सामना कसा करतो आणि संधीचा लाभ कसा घेतो, हे पाहणे गरजेचे आहे. काँग्रेसच अर्थव्यवस्थेला संकटातून बाहेर काढू शकेल, असा विश्वासही डॉ. सिंग यांनी व्यक्त केला.जम्मू आणि काश्मीरच्या वादाला चुकीच्या पद्धतीने हाताळल्याचा आरोप केला. अडीच युद्धे लढण्याची सरकारची भाषा म्हणजे असेच पोकळ आश्वासन आहे, असे ते म्हणाले. सिंग यांनी परराष्ट्र धोरण, संरक्षण आणि अर्थव्यवस्थेशी संबंधित अनेक मुद्यांवर भाष्य केले तेव्हा पक्ष नेत्यांनी टाळ््यांच्या कडकडाटाने व उभे राहून त्यांना दाद दिली.संरक्षणावर देशाच्या सकल देशी उत्पादनाचा (जीडीपी) केवळ १.६ टक्के भागच खर्च केला. देशाच्या सुरक्षेला जी आव्हाने आहेत त्यांना या खर्चातून तोंड दिले जाऊ शकत नाही, असे त्यांनी म्हटले.>परराष्ट्र धोरणाच्या आघाडीवर असे अनेक मुद्दे आहेत की, ज्यांना मोदी सरकारने अतिशय ढिसाळपणे हाताळले, असा आरोप त्यांनी केला. ते म्हणाले, जम्मू आणि काश्मीरचा प्रश्न मोदी सरकारने जसे चुकीच्या पद्धतीने हाताळला, तसे यापूर्वी कधी झाले नव्हते, हे आम्ही मान्य केलेच पाहिजे.सरकारच्या दोन शाखा परस्परांच्या विरोधात काम करीत असून, वातावरण दिवसेंदिवस चिघळत आहे, असे सिंग म्हणाले. सीमेपलीकडून होत असलेला दहशतवाद असेल की, देशांतर्गतचा दहशतवाद किंवा अंतर्गत बंडखोरी आमच्या देशाच्या सीमा सुरक्षित नाहीत, हे स्पष्टच आहे. हे आजचे प्रश्न असून, प्रत्येक नागरिकासाठी ते मोठ्याच काळजीचे आहेत, असे ते म्हणाले.>सिद्धू यांनी मागितली माफीनवज्योत सिंग सिद्धू यांनी अधिवेशनात डॉ. मनमोहन सिंग यांची माफी मागितली. तुम्हाला ओळखण्यासाठी मला दहा वर्षे लागली. तुम्ही सरदार आहात, असरदारही आहात, असे म्हणत, त्यांनी डॉ. सिंग यांचे चरणस्पर्शही केले.काँग्रेस-राष्ट्रवादीला करावा लागेल त्याग : पृथ्वीराज चव्हाणकाँग्रेस आणि राष्ट्रवादी यांच्या आघाडीवर जोर देताना महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण म्हणाले की, जर दोन्ही पक्ष वेगवेगळे लढले तर, पराभवाचा धोका आहे. त्यासाठी दोन्ही पक्षांना त्याग करावा लागेल. जेणेकरुन भाजपला रोखले जाऊ शकेल.

टॅग्स :congressकाँग्रेस