शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
5
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
6
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
7
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
8
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
9
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
10
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
11
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
12
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
13
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
14
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
15
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
16
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
17
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
18
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
19
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
20
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
Daily Top 2Weekly Top 5

अब की बार, ऍपमधून कामाचा हिशेब देणार सरकार

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 26, 2018 18:38 IST

जानेवारीमध्ये सरकार देणार योजनांची माहिती आणि आकडेवारी

नवी दिल्ली: आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मोदी सरकार आपल्या महत्त्वाकांक्षी योजनांची माहिती आणि आकडेवारी लोकांसमोर ठेवणार आहे. सरकारची कामगिरी ऍपच्या माध्यमातून जनतेपर्यंत पोहोचवण्याचा सरकारचा प्रयत्न आहे. या माध्यमातून स्मार्ट सिटी, प्रत्येकासाठी घर, अमृत, स्वच्छ भारत, हृदय या योजनांची माहिती लोकांपर्यत पोहोचवली जाणार आहे. मोदी सरकारच्या महत्त्वाकांक्षी योजना, त्यामुळे साध्य झालेली कामगिरी, त्यांच्यी सध्याची स्थिती याची माहिती एका विशेष ऍपच्या माध्यमातून सरकारमार्फत जनतेसाठी उपलब्ध करुन देण्यात येईल. यामधील सर्वाधिक माहिती शहर आणि घरकुल विकास मंत्रालयाशी संबंधित असेल. जानेवारी महिन्यात ही माहिती सर्वसामान्य जनतेसाठी उपलब्ध असेल. जनतेपासून कोणतीही माहिती लपवू नये, या मतापर्यंत पोहोचल्यानंतर योजनांची माहिती आणि आकडेवारी प्रसिद्ध करण्याचा निर्णय घेण्यात आला, असं एका वरिष्ठ अधिकाऱ्यानं नाव प्रसिद्ध न करण्याच्या अटीवर सांगितलं. सर्व योजनांची माहिती आणि आकडेवारी ऍपच्या माध्यमातून जनतेपर्यंत पोहोचवण्याचा सरकारचा प्रयत्न असल्याची माहिती अधिकाऱ्यानं दिली. यामुळे प्रशासनातील पारदर्शकता वाढेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. या ऍपमध्ये पायाभूत सुविधांचं जियो टॅगिंग केलं जाईल. याशिवाय विकासकामांचे व्हिडीओ, फोटो आणि पत्तेदेखील दिले जातील. आतापर्यंत ग्रामीण विकास मंत्रालयानं त्यांच्या महत्त्वाकांक्षी योजनेसाठी असं पाऊल उचललं आहे. मात्र स्वच्छ भारत योजनेच्या अंतर्गत अशी माहिती कशी द्यायची, असा प्रश्न अधिकाऱ्यांना पडला आहे. 

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीBJPभाजपाPradhan Mantri Awas Yojanaप्रधानमंत्री आवास योजना