शहरं
Join us  
Trending Stories
1
ईडीवर विशेष न्यायालयाचे ताशेरे, ‘खटल्यांना विलंब केल्यास आरोपी अनिश्चित काळ तुरुंगात राहतील’
2
मतदानाच्या वाढीव टक्केवारीवर संशय; काँग्रेसने नोंदवला केंद्रीय निवडणूक आयोगाकडे आक्षेप
3
आनंद दिघे यांच्या पावलावर पाऊल ठेवून मुख्यमंत्री शिंदेंनी काबीज केले ठाणे
4
धावत्या लोकलमध्ये सशस्त्र हल्ल्यात प्रवाशाचा मृत्यू; कल्याण रेल्वे पोलिसांनी दोघांना केली अटक
5
ते सीबीआय, इन्कम टॅक्स, ईडीमधून उमेदवार शोधतात; आदित्य ठाकरे यांचा आरोप
6
आमोदा येथील मंदिराला भीषण आग;मंदिरासह जिल्हा बँक शाखाही आगीच्या भक्ष्यस्थानी
7
अमोल कीर्तिकर यांच्या मालमत्तेत नऊ कोटींनी वाढ; ५३ एकर शेतजमीन
8
‘डीपफेक’वर कारवाईस निवडणूक आयोग सक्षम, व्हिडीओंवरील बंदीबाबत निर्देश देण्यास दिल्ली हायकोर्टाचा नकार
9
प्रज्वल रेवण्णाविरोधात ‘लूकआऊट’ नोटीस; एसआयटीपुढे हजर राहण्यासाठी ७ दिवसांची मागणी
10
मनसेच्या अविनाश जाधवांवर गुन्हा दाखल; पाच कोटींच्या वसुलीसाठी सोन्याच्या दागिन्यांचे व्यापारी जैन यांना धमकावल्याचा आरोप
11
सर्वेक्षणाच्या नावाखाली मतदारांची माहिती मागणे तातडीने बंद करा; निवडणूक आयोगाचे आदेश
12
बृजभूषण यांचा पत्ता कट; पुत्राला भाजपचे तिकीट, लैंगिक शोषणाचा आरोप भोवला
13
जातिवाचक शिवीगाळ, नग्न करून मारहाण; तरुणाची आत्महत्या, कोपर्डी घटनेतील पीडितेच्या भावासह तिघांविरुद्ध गुन्हा
14
रस्ता बांधल्यावरुन चीनला भारताने चांगलेच खडसावले; शक्सगाम खोरे हा आमचा भाग, केला दावा
15
सूर्यापेक्षा दीडपट दूरवरुन आला पृथ्वीवर सिग्नल; नासाच्या ‘सायके’ यानाची यशस्वी कामगिरी
16
भूषण पाटील दहा कोटींचे धनी; मालमत्तेत साडेसहा कोटींची वाढ
17
श्रीकांत शिंदेंकडे ७.५ कोटींची संपत्ती; वाहने नाहीत, सातारा जिल्ह्यात शेती
18
9 हजार कोटींचे कर्ज...पाकिस्तानची झोळी भरणाऱ्या IMF कडे एवढा पैसा कुठून येतो?
19
CSK Fan Mystery Girl Photos: IPL 2024 मध्ये दिसलेली CSKची नवीन 'मिस्ट्री गर्ल' कोण? MS Dhoni ची आहे 'जबरा फॅन', पाहा Photos
20
पाच लाखांच्या मताधिक्याने श्रीकांत शिंदे निवडून येणार, पाच वर्ष सेवा करणार: CM एकनाथ शिंदे

मोदी सरकारने सुरू केली ‘रॉ’मध्ये साफसफाई!

By ऑनलाइन लोकमत | Published: August 22, 2018 2:04 AM

चार वरिष्ठ अधिकाऱ्यांना दाखवला घरचा रस्ता; १३ अधिकाºयांवर बडतर्फीची कुऱ्हाड?

- हरीश गुप्तानवी दिल्ली : पंतप्रधान कार्यालयाने आता ‘रॉ’ या अत्यंत महत्त्वाच्या गुप्तचर संस्थेची साफसफाई करण्याच्याकडे मोर्चा वळविला असून, कर्तव्यकसूर किंवा अपेक्षाकृत कामगिरी नसलेल्या १३ अधिकाºयांवर बडतर्फीची कुऱ्हाड चालण्याची शक्यता आहे. त्यादृष्टीने प्रक्रियाही सुरूकरण्यात आली आहे. मागच्या महिन्यात ‘रॉ’च्या चार वरिष्ठ अधिकाऱ्यांना घरचा रस्ता दाखविण्यात आला असून, आतापर्यंत १७६ सरकारी अधिकाऱ्यांना डच्चू देण्यात आला आहे.बडतर्फीची टांगती तलवार असलेल्या ‘रॉ’च्या १३ अधिकाºयांपैकी सह-सचिवपदावरील चार कनिष्ठ अधिकारी गेल्या वीस वर्षांपासून ‘रॉ’ मध्ये सेवेत आहेत. त्यांची कामगिरी समाधानकारक आढळून आलेली नाही. मोदी सरकारने सत्तेत आल्यापासून डीएसपी, फिल्ड आॅफिसरसह अवर सचिवपदावरील ‘रॉ’च्या सर्व अधिकाºयांच्या सेवापुस्तिकाही खंगाळून काढल्या आहेत. काहींच्या बाबतीत कर्तव्याप्रती प्रामाणिक नसल्याच्या आरोपांबाबत संदिग्धता असल्याने कोर्टबाजी टाळण्यासाठी कारवाई टाळण्यात आलेली आहे. यापैकी काहींनी केंद्रीय प्रशासकीय लवादाकडे (कॅट) धाव घेत मुदतपूर्व सेवा बडतर्फीला आव्हान दिले आहे.पाकिस्तानी दहशतवाद्यांनी पठाणकोट हवाई तळावर हल्ला केल्याच्या पार्श्वभूमीवर मोदी यांनी सलग दोन दिवस केंद्रीय गुप्तचर संस्थेच्या कामकाजाचा आढावा घेतला होता. तेव्हापासून ‘रॉ’मध्ये साफसफाईची प्रक्रिया सुरूकरण्यात आली. आढावा बैठकीत गुप्तचर विभाग, रॉ, राज्य पोलीस आणि अन्य संस्थेचा पूर्णत: अपयशी ठरल्याचा निष्कर्ष काढण्यात आला. तसेच रॉ, गुप्तचर विभाग आणि अन्य संस्थेतील अधिकारी अन्य कामात सहभागी असल्याच्या तक्रारीही पंतप्रधान कार्यालयाकडे आल्या होत्या.रॉ’ आता मनोरंजन आणि पत्नीसाठी वेल्फेअर क्लब बनलाआहे, असे तत्कालीन पंतप्रधान स्व. राजीव गांधी यांनीही एकदा म्हटले होते. रॉ’मधील भरती प्रक्रिया अपारदर्शक असल्याने काही वरिष्ठ अधिकाºयांनी आपल्या जवळच्या नातेवाईकांची वर्णी लावल्याचेही आढळून आले होते.मोदी यांच्या निर्देशानुसार पंतप्रधान कार्यालयाने कामकाज नीटनेटके करण्याचा आणि प्रत्येकाला उत्तरदायी ठरविण्याचा निर्णय घेतला. राष्टÑीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल हे कडक स्वभावाचे मानले जातात. त्यांनीही काही नीतिभ्रष्ट अधिकाºयांच्या बाबतीत कठोर भूमिका घेतली होती.पंतप्रधानांच्या निर्देशानुसार सेवा शर्ती, नियमानुसार सेवेची ३० वर्षे पूर्ण करणाºया किंवा वयाची ५० वर्षे पूर्ण केलेल्या अधिकाºयांच्या कामगिरीचा आढावा घेण्याची मुभा कार्मिक आणि प्रशिक्षण विभागाला आहे. तथापि, अलीकडच्या दशकात एवढ्या मोठ्या प्रमाणावर दंडात्मक कारवाई करण्यात आलेली नव्हती.सुमार दर्जाची कामगिरी असलेल्या ज्या अधिकाºयांना स्वत:हून राजीनामा देण्यास सांगण्यात आले आहे किंवा बडतर्फीच्या प्रक्रियेतहत येणाºया अधिकाºयांची कामगिरी सुमार आढळल्यास त्यांना बढती नाकारली जाऊ शकते.बडतर्फीचा अधिकारकेंद्रीय राज्यमंत्री जितेंद्र सिंह यांनी जुलै २०१४ मध्ये संसदेतही सांगितले होते की, नवीन सरकार आल्यापासून ए-श्रेणीतील ५३, बी-श्रेणीतील १२३ अधिकाºयांविरुद्ध हा नियम लागू करण्यात आला आहे. या नियमानुसार सार्वजनिक हितासाठी मुदतपूर्व बडतर्फ करण्याची सरकारला मुभा आहे. तथापि, त्यांनी तपशील दिला नव्हता.

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीBJPभाजपा