‘मोदी सरकारकडून अमेठीची उपेक्षा’
By Admin | Updated: May 21, 2015 00:45 IST2015-05-21T00:45:54+5:302015-05-21T00:45:54+5:30
केंद्रातील मोदी सरकार शेतकरी आणि गरिबांचे सरकार नाही तर केवळ बड्या उद्योगपतींचे सरकार आहे. या सरकारकडून अमेठीची उपेक्षा होत आहे,

‘मोदी सरकारकडून अमेठीची उपेक्षा’
लखनौ/ अमेठी : केंद्रातील मोदी सरकार शेतकरी आणि गरिबांचे सरकार नाही तर केवळ बड्या उद्योगपतींचे सरकार आहे. या सरकारकडून अमेठीची उपेक्षा होत आहे, असा आरोप काँगे्रस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी बुधवारी केला. सूड घ्यायचा तर माझा घ्या. अमेठीच्या गरीब जनतेने तुमचे काहीही बिघडवलेले नाही, या शब्दांचीही त्यांनी पुनरावृत्ती केली.
राहुल गांधी यांचा अमेठी मतदारसंघाचा तीन दिवसांचा दौरा बुधवारी संपला. (वृत्तसंस्था)