मोदी सरकार अमेठीत करत आहे सूडाचे राजकारण - राहुल गांधी
By Admin | Updated: May 7, 2015 13:45 IST2015-05-07T13:23:56+5:302015-05-07T13:45:26+5:30
मोदी सरकार अमेठीत सूडाचे राजकारण करत असल्याचा घणाघाती आरोप काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधींनी आज लोकसभेत केला.

मोदी सरकार अमेठीत करत आहे सूडाचे राजकारण - राहुल गांधी
>ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. ७ - मोदी सरकार अमेठीत सूडाचे राजकारण करत असल्याचा घणाघाती आरोप काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधींनी आज लोकसभेत केला. अमेठीतील फूड पार्क प्रोजेक्टच्या मुद्यावर बोलताना त्यांनी हे वक्तव्य केले. केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंग यांनी मात्र राहुल यांचा हा आरोप फेटाळून लावत याप्रकरणाची चौकशी करण्याचे आश्वासन दिेले.
अमेठीमधील फूड पार्क प्रोजेक्ट रद्द करण्याबद्दल राहुल बोलत होते 'लोकसभा निवडणुकीदरम्यान पंतप्रधान मोदी अमेठीत आले होते. आपण येथे सूडाचे राजकारण करण्यास आलो नसून बदल घडवण्यास आलो आहोत, असे त्यांनी त्यांच्या भाषणादरम्यान शेतक-यांना सांगितले होते. मात्र आता ते सूडाचेच राजकारण करत आहेत' असे राहुल गांधी यांनी म्हटले. तसेच हा प्रोजक्टे रद्द न करण्याचे आवाहान त्यांनी केले.