शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
3
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
4
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
5
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
6
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
7
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
8
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
9
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
10
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
11
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
12
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
13
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
14
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
15
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
16
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
17
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
18
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
19
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
20
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
Daily Top 2Weekly Top 5

सरकारने एअर इंडियाच्या विमान भाड्याचे 326 कोटी रुपये थकवले

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 13, 2018 13:08 IST

वेळ पडल्यास एअर इंडियांकडून अतिमहत्त्वाच्या व्यक्तींच्या गरजांनुसार या विमानांमध्ये बदलही केले जातात. 

नवी दिल्ली: कर्जाच्या ओझ्यामुळे आधीच दबलेली एअर इंडिया सरकारच्या 'चलता है' वृत्तीमुळे आणखीनच गर्तेत चालल्याचा प्रकार समोर आला आहे. नुकत्याच समोर आलेल्या माहितीनुसार  अतिमहत्त्वाच्या व्यक्तींनी परदेश दौऱ्यादरम्यान केलेल्या विमान प्रवासाचे 326 कोटी रुपये सरकारने थकवले आहेत. निवृत्त कमांडर लोकेश बात्रा यांनी माहिती अधिकारातंर्गत मागविलेल्या कागदपत्रांमुळे ही बाब उघड झाली.या माहितीनुसार, विविध सरकारी खात्यांनी मिळून एअर इंडियाची एकूण 325.81 कोटी रूपयांचे बिल थकवले आहे. यामध्ये गेल्यावर्षीचे 84.01 कोटी आणि यंदाच्या 241.80 कोटी रूपयांचा समावेश आहे. एअर इंडियाकडून राष्ट्रपती, पंतप्रधान आणि अतिमहत्त्वाच्या सरकारी व्यक्तींच्या प्रवासासाठी खासगी विमाने उपलब्ध करून दिली जातात. वेळ पडल्यास एअर इंडियांकडून अतिमहत्त्वाच्या व्यक्तींच्या गरजांनुसार या विमानांमध्ये बदलही केले जातात. अहवालातील माहितीनुसार एअर इंडियाचे पैसे थकवणाऱ्यांमध्ये परराष्ट्र मंत्रालय, संरक्षण मंत्रालय आणि मंत्रिमंडळ सचिवालय आघाडीवर आहे. परराष्ट्र मंत्रालयाने सर्वाधिक 178.55 कोटींची रक्कम थकवली आहे. त्यानंतर मंत्रिमंडळ सचिवालय आणि पंतप्रधान कार्यालयाने 128.84 कोटी, तर संरक्षण मंत्रालयाने 18.42 कोटी रूपयांची देणी थकवली आहेत. याशिवाय, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या परदेश दौऱ्यापोटी झालेल्या 272.80 कोटींच्या खर्चापैकी 118.72 कोटी रूपये अजूनही एअर इंडियाला मिळालेले नाहीत.  दरम्यान, केंद्र सरकार लवकरच एअर इंडियाकडून दोन बोईंग विमाने खरेदी करणार आहे. या विमानांमध्ये आवश्यक ते बदल करून 2020 पर्यंत ती राष्ट्रपती आणि पंतप्रधानांच्या ताफ्यात दाखल होतील, अशी माहिती सरकारी सूत्रांनी दिली.  

टॅग्स :Air Indiaएअर इंडियाGovernmentसरकार