शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

मोदी सरकारच्या मंत्रिमंडळ विस्ताराचा मुहूर्त अखेर निश्चित; देशाच्या इतिहासात पहिल्यांदाच 'असं' घडणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 6, 2021 20:23 IST

बहुप्रतिक्षित, बहुचर्चित मंत्रिमंडळ विस्ताराला अखेर मुहूर्त सापडला; उद्या दिल्लीत मोदींच्या मंत्रिमंडळाचा जंबो विस्तार

नवी दिल्ली: केंद्रीय मंत्रिमंडळाचा विस्तार उद्या संध्याकाळी ६ वाजता होणार आहे. मोदी सरकार दुसऱ्यांदा सत्तेत आल्यापासून मंत्रिमंडळाचा विस्तार करण्यात आलेला नव्हता. सध्याच्या घडीला अनेक वरिष्ठ मंत्र्यांकडे एकापेक्षा अधिक खात्यांचा प्रभार आहे. त्यामुळे या मंत्रिमंडळ विस्ताराकडे अनेकांचं लक्ष लागलं होतं. अखेर उद्या संध्याकाळी मंत्रिमंडळाचा विस्तार होत आहे....म्हणून दिल्लीला आलोय; मंत्रिपदाची चर्चा असताना नारायण राणेंनी सांगितलं वेगळंच कारण

मोदी सरकारच्या मंत्रिमंडळात उद्या जवळपास २० नव्या चेहऱ्यांचा समावेश होईल. यामध्ये तरुण खासदारांना अधिक प्राधान्य देण्यात येईल. भारताच्या इतिहासातील हे सर्वात तरुण कॅबिनेट असेल, असं वृत्त एनडीटीव्हीनं सरकारमधील सुत्रांच्या हवाल्यानं दिलं आहे. सरकारमधील मंत्र्यांचं सरासरी वय पाहता मोदी सरकारचं नवं कॅबिनेट इतिहासातलं सर्वात तरुण कॅबिनेट असेल. यामध्ये अधिक महिलांना संधी देण्यात येईल. प्रशासनाचा अनुभव असलेल्यांना या विस्तारात विशेष प्राधान्य देण्यात येईल, असं सुत्रांनी सांगितलं.महाराष्ट्रातील दोन मंत्र्यांना पंतप्रधान मोदी देणार डच्चू? मंत्रिमंडळ विस्ताराआधी धाकधूक वाढली

'नव्या कॅबिनेटमध्ये जवळपास दोन डझन मंत्री इतर मागासवर्गीय जातींमधील (ओबीसी) असतील. लहान जातींच्या प्रतिनिधींनादेखील मंत्रिमंडळ विस्तारात स्थान देण्याचा सरकारचा प्रयत्न आहे. या कॅबिनेटचं सरासरी शिक्षणदेखील अधिक असेल. नव्या चेहऱ्यांमध्ये पीएचडी, एमबीए, पदव्युत्तर शिक्षण घेतलेल्यांचा समावेश असेल. कॅबिनेट विस्तारात राज्य आणि प्रांतांकडे विशेष लक्ष देण्यात आलं आहे,' अशी माहिती सुत्रांनी दिली.

ज्योतिरादित्य सिंधिया, सर्बानंद सोनोवाल, पशुपती पारस, नारायण राणे, कपिल पाटील, वरुण गांधी यांना मंत्रिमंडळ विस्तारात स्थान मिळण्याची शक्यता अधिक आहे. हे सर्व खासदार सध्या दिल्लीत आहेत. ज्योतिरादित्य सिंधिया यांनी त्यांच्या समर्थक आमदारांसह काँग्रेसला रामराम केल्यानं मध्य प्रदेशात भाजपचं सरकार आलं. तर सोनोवाल यांनी हिमंता बिस्व सरमा यांच्यासाठी मुख्यमंत्रिपद सोडलं. महाराष्ट्रात सध्या मराठा आणि ओबीसी आरक्षणाचा विषय तापला आहे. राणे मराठा समाजाचं, तर पाटील ओबीसी समाजाचं प्रतिनिधीत्व करतात. त्यामुळे या दोघांची निवड निश्चित मानली जात आहे.

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीNarayan Raneनारायण राणे Jyotiraditya Scindiaज्योतिरादित्य शिंदेBJPभाजपाcongressकाँग्रेस