शहरं
Join us  
Trending Stories
1
पालघर: मासेमारी करताना चुकून पाकिस्तानी हद्दीत प्रवेश केलेले नामदेव मेहेर पाकच्या ताब्यात!
2
पार्थ पवारांच्या कंपनीचा आणखी एक गैरव्यवहार; आधी जमीन घाेटाळा, मग व्यवहार रद्द
3
आजचे राशीभविष्य, ०८ नोव्हेंबर २०२५: काळजी मिटेल, आनंदाची बातमी मिळेल, धनलाभ शक्य
4
धनंजय मुंडेंनी दिली मारण्याची सुपारी; मनोज जरांगे यांचा गंभीर आरोप; पोलिसांकडे तक्रार
5
वर्ल्ड चॅम्पियन्सचा गौरव! स्मृती, जेमिमा, राधा यादव यांना प्रत्येकी सव्वादोन कोटींचे बक्षीस
6
जिल्हा परिषद निवडणुकांची दोन आठवड्यांत घोषणा; ३० दिवसांच्या कालावधीतच पार पाडणार निवडणुका
7
नरेंद्र माेदी माझे मित्र आहेत; पुढील वर्षी मी नक्की भारतात येईन: डोनाल्ड ट्रम्प
8
मनोज जरांगे यांच्या आरोपांची सीबीआय चौकशी व्हायलाच हवी; धनंजय मुंडेंचे आरोपांना प्रत्युत्तर
9
प्रभागरचना, आरक्षणावरील निकालांच्या अधीन असेल स्थानिक संस्था निवडणूक- उच्च न्यायालय
10
धक्कादायक! ऑनलाइन क्रीम खरेदी केली, महिलेच्या शरीरावर सापासारखे व्रण; १० वर्षांत १२ लाख रुपये खर्च
11
अधिकाऱ्यांना वाचवण्याच्या नादात दोघांचा मृत्यू; सॅण्डहर्स्ट रेल्वे अपघातामध्ये मुलीचा मृत्यू; आई जखमी
12
सरकार कुणालाही पाठीशी घालणार नाही, अहवालात जो दोषी आढळेल त्याच्यावर कारवाई, जमीन घोटाळ्यासंदर्भात मुख्यमंत्र्यांची स्पष्टोक्ती
13
पार्थ पवार भूखंड प्रकरणाचा व्यवहार रद्द; अजित पवार म्हणाले, "मी मुख्यमंत्री फडणवीसांना कॉल केला आणि..."
14
देशातील सर्वात मोठ्या विमानतळावर विमानांच्या उड्डाणाला ब्रेक! ATC मध्ये झाला तांत्रिक बिघाड, १००० विमानांना फटका
15
60 टक्क्यांहून अधिक मतदान म्हणजे NDA ची सत्ता परतणार; बिहारबाबत अमित शाहांचा दावा
16
"त्या एक टक्केवाल्या पाटलाला पार्थ पवारने जमीन दिली असती का?"; अजित पवारांचा उल्लेख, दानवेंची मोठी मागणी
17
धोत्रे हत्या प्रकरण: अत्यंविधीला आला आणि पोलिसांनी पकडला, स्मशानभूमीत लावला होता सापळा
18
चार नाही, दहा लाख महिना पोटगी, मोहम्मद शमीच्या पत्नीच्या मागणीवर सर्वोच्च न्यायालयाने नोटीस बजावली
19
महाराष्ट्राचा अभिमान! स्मृती, जेमिमा अन् राधाचा मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते कोट्यवधींच्या बक्षीसासह सन्मान
20
बेळगावमध्ये ऊस आंदोलन पेटले! हत्तरगी टोल नाक्यावर शेतकऱ्यांकडून दगडफेक

सीआरपीएफ जवानांच्या रेशनसाठीही सरकारकडे पैसे नाही; ओवेसींची मोदी सरकारवर टीका

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 30, 2019 15:58 IST

मोदी सरकार रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाकडून अंतरिम लाभांश मागण्याची शक्यता आहे. सरकार आरबीआयकडून ३० हजार कोटींचा लाभांश मागू शकतं.

नवी दिल्ली: मोदी सरकार रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाकडून अंतरिम लाभांश मागण्याची शक्यता आहे. सरकार आरबीआयकडून ३० हजार कोटींचा लाभांश मागू शकतं. २०१९-२० मधील वित्तीय तूट एकूण जीडीपीच्या ३.३ टक्के ठेवण्याचा सरकारचा प्रयत्न आहे. मात्र सध्याचं सरकारचं उत्पन्न पाहता वित्तीय तुटीचं लक्ष्य गाठणं अवघड दिसत आहे. त्यामुळे सरकार आरबीआयकडे लाभांश मागू शकतं, असं वृत्त एका इंग्रजी दैनिकाने दिलं होतं. मात्र यावर एमआयएम पक्षाचे अध्यक्ष असदुद्दीन ओवेसी यांनी  ट्विट करत मोदी सरकारवर टीका केली आहे.

असुदुद्दीन ओवेसी म्हणाले की, प्रत्येक क्षेत्रात देशाचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. मोदी सरकारकडे सीआरपीएफ जवानांच्या रेशनसाठीही पैसे नाहीत. तसेच एमटीएनएलने देखील कामगारांना पगार देण्यात उशीर करत असल्याचे देखील त्यांनी सांगितले. त्याचप्रमाणे मोदी सरकारने मार्चपासून आरबीआयकडून 2 लाख 34 हजार कोटी रुपये घेतले असून आतापर्यत कोण्यातही सरकारने एका वर्षात 50 कोटी रुपये घेतले नसल्याचे सांगत मोदी सरकारवर टीका केली आहे.  

कॉर्पोरेट करात कपात करण्यात आल्यानं सरकारच्या महसुलावर परिणाम होणार आहे. याशिवाय जीडीपी वाढीची टक्केवारी ५ टक्क्यांपर्यंत खाली घसरली आहे. गेल्या ६ वर्षांमधील हा निच्चांक आहे. जीडीपीचा आकडा वर नेण्याचं आव्हान सरकारसमोर आहे. त्यामुळेच सरकार आरबीआयच्या तिजोरीत हात घालू शकतं. 'सरकार गरज पडल्यास आरबीआयकडे अंतरिम लाभांश मागू शकतं. हा लाभांश २५ ते ३० हजार कोटींचा असू शकेल,' अशी माहिती एका अधिकाऱ्यानं नाव प्रसिद्ध न करण्याच्या अटीवर दिली. जानेवारीच्या सुरुवातीला सरकार आरबीआयकडून लाभांश मागू शकतं, असंदेखील या अधिकाऱ्याने सांगितलं आहे. 

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीAsaduddin Owaisiअसदुद्दीन ओवेसीReserve Bank of Indiaभारतीय रिझर्व्ह बँकIndiaभारत