शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
3
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
4
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
5
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
6
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
7
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
8
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
9
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
10
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
11
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
12
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
13
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
14
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
15
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
16
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
17
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
18
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
19
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
20
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

आता AI देईल शेतकऱ्यांच्या प्रश्नांची उत्तरे, पीएम किसान योजनेसाठी चॅटबॉट सुरू, मोदी सरकारचा मोठा उपक्रम

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 27, 2023 10:40 IST

शेतकऱ्यांच्या प्रश्नांना त्वरित आणि अचूक उत्तरे देण्यासाठी एआय (AI) चॅटबॉट सुरू करण्यात आले आहे. 

नवी दिल्ली : कृषी क्षेत्राला तंत्रज्ञानाशी जोडण्यासाठी मोदी सरकार सातत्याने नवनवीन पावले उचलत आहे. दरम्यान, पीएम किसान योजना सर्व शेतकऱ्यांपर्यंत पोहोचण्यासाठी आणि शेतकऱ्यांच्या प्रश्नांना त्वरित आणि अचूक उत्तरे देण्यासाठी एआय (AI) चॅटबॉट सुरू करण्यात आले आहे. 

केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण राज्यमंत्री कैलाश चौधरी यांनी पीएम किसान एआय चॅटबॉट लाँच केले. यामध्ये विविध भाषांमधील सुविधा देण्यात आल्या आहेत. दरम्यान, पीएम-किसान तक्रार व्यवस्थापन प्रणालीमध्ये एआय चॅटबॉट सादर करण्याचा उद्देश शेतकऱ्यांना सुलभ आणि सोपा व्यासपीठ उपलब्ध करून देणे हा आहे.

कृषी सचिव मनोज आहुजा आणि अतिरिक्त कृषी सचिव प्रमोद मेहराडा यांच्या उपस्थितीत कृषी आणि शेतकरी कल्याण राज्यमंत्री कैलाश चौधरी यांनी एआय  चॅटबॉट लाँच केले. कार्यक्रमादरम्यान, अतिरिक्त कृषी सचिव प्रमोद मेहराडा यांनी चॅटबॉटची वैशिष्ट्ये आणि शेतकऱ्यांसाठी ते कसे फायदेशीर आहे, याबद्दल सविस्तर सांगितले. 

निवेदनानुसार, चॅटबॉट सध्या इंग्रजी, हिंदी, बंगाली, उडिया आणि तामिळ भाषेत सुरु करण्यात आले आहे. लवकरच देशातील सर्व 22 अधिकृत भाषांमध्ये उपलब्ध होईल. एकस्टेप फाउंडेशन आणि भाशिनी यांच्या मदतीने हा चॅटबॉट विकसित आणि सुधारला जात आहे. एआय चॅटबॉट त्याच्या विकासाच्या टप्प्यात शेतकऱ्यांना त्यांच्या अर्जाची स्थिती, पेमेंट तपशील, अपात्रतेची स्थिती आणि इतर योजना-संबंधित अद्यतनांची माहिती मिळविण्यात मदत करेल.

दरम्यान, मंत्रालयाने एका निवेदनात म्हटले आहे की, एआय चॅटबॉट लाँच हे पीएम-किसान योजनेची कार्यक्षमता आणि पोहोच वाढविण्याच्या दिशेने एक महत्त्वाचे पाऊल आहे. तसेच, यामुळे शेतकऱ्यांना त्यांच्या प्रश्नांची त्वरित, स्पष्ट आणि अचूक उत्तरे मिळतील.

टॅग्स :PM Kisan Schemeप्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनाFarmerशेतकरीNarendra Modiनरेंद्र मोदीtechnologyतंत्रज्ञान