मोदींनी विरोधी खासदाराला पाणी पाजलं
By Admin | Updated: December 16, 2015 16:16 IST2015-12-16T15:40:27+5:302015-12-16T16:16:10+5:30
राजकारणात यशस्वी होण्यासाठी विरोधकांना जिंकून घेणेही तितकेच महत्वाचे असते. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी बुधवारी लोकसभेत असाच प्रयत्न केला.

मोदींनी विरोधी खासदाराला पाणी पाजलं
ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. १६ - राजकारणात यशस्वी होण्यासाठी विरोधकांना जिंकून घेणेही तितकेच महत्वाचे असते. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी बुधवारी लोकसभेत असाच प्रयत्न केला आणि सभागृहातील सदस्यांनीही त्याला दाद दिली.
सीबीआयने मंगळवारी दिल्ली सरकारच्या सचिवालयातील कार्यालयावर मारलेल्या छाप्या विरोधात लोकसभेत आपचे खासदार भगवंत मान जोरदार घोषणाबाजी करत होते. घोषणाबाजी करताना त्यांना अचानक अस्वस्थ वाटू लागले म्हणून ते लोकसभा सचिवांच्या टेबलाजवळ पाण्याचा ग्लास शोधू लागले.
मोदी तिथे जवळच बसले होते. त्यांनी लगेच आपल्यासमोरचा पाण्याचा ग्लास पुढे केला. भगवंत मानही लगेच त्या ग्लासातील पाणी प्यायले. मान यांनी ग्लास खाली ठेवण्यापूर्वी मोदींकडे पाहिले आणि दोघांनी स्मितहास्य केले.
मोदींच्या या कृतीचे लोकसभेतील भाजप खासदारांनी बाके वाजवून कैतुक केले. मान यांनी त्यानंतर पुन्हा सरकारविरोधात घोषणाबाजी सुरु केली. संसद असे प्रसंग क्वचित अनुभवायला मिळतात.