शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
2
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
3
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
4
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
5
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
6
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
7
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
8
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
9
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
10
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
11
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
12
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
13
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
14
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
15
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
16
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
17
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
18
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
19
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
20
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
Daily Top 2Weekly Top 5

मोदींनी दिला नवा नारा, जय जवान, जय किसान, जय विज्ञान आणि... 

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 3, 2019 15:35 IST

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आगामी लोकसभा निवडणुकीत विजय मिळवण्यासाठी जोरदार मोर्चेबांधणी सुरू केली आहे.

ठळक मुद्देपंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आगामी लोकसभा निवडणुकीत विजय मिळवण्यासाठी जोरदार मोर्चेबांधणी सुरू केली आहे. च संशोधनालाही महत्त्वाचे स्थान मिळावे म्हणून जय जवान, जय किसान, जय विज्ञान या घोषणांमध्ये जय अनुसंधान हा नाराही जोडला

जालंधर - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आगामी लोकसभा निवडणुकीत विजय मिळवण्यासाठी जोरदार मोर्चेबांधणी सुरू केली आहे. नववर्षाच्या सुरुवातीला प्रसारमाध्यमांना प्रदीर्घ मुलाखत दिल्यानंतर आज पंजाबमधून मोदींनी आपल्या प्रचार अभियानास सुरुवात केली आहे. दरम्यान, जालंधर येथील लव्हली प्रोफेशनल युनिव्हर्सिटी येथे इंडियन सायन्स काँग्रेसचे उदघाटन केल्यानंतर उपस्थितांना संबोधित करताना मोदींनी संशोधनाचे महत्त्व अधोरेखित केले. तसेच संशोधनालाही महत्त्वाचे स्थान मिळावे म्हणून जय जवान, जय किसान, जय विज्ञान या घोषणांमध्ये जय अनुसंधान हा नाराही जोडला. यावेळी मोदी म्हणाले की, ''शेकडो वर्षांपासून संशोधक जे संशोधन करत आहेत. त्याचा फायदा देशाला मिळणार आहे. देशाला पुढे घेऊन जाण्यामध्ये शास्त्रज्ञ आणि विद्यार्थ्यांचा मोठा वाटा आहे. माजी पंतप्रधान अटल विहारी वाजपेयी यांनी जय जवान, जय किसान यांच्यासोबत जय विज्ञान असा नारा दिला होता. आता मी यामध्ये जय अनुसंधान या नाऱ्याची भर घालतो.'' 

आज केंद्र सरकार तरुणांना स्टार्टअपसाठी प्रेरित करत आहे. त्यासाठी मदतही करण्यात येत आहे. शेतकऱ्यांच्या मेहनतीमुळे पिकांचे उत्पन्न वाढले आहे. पण अजूनही नवभारताच्यासमोरील आव्हान पाहता यामध्ये वैज्ञानिक तंत्रज्ञानाचा वापरही झाला पाहिजे. इज ऑफ डुईंग बिझनेसनंतर आता इज ऑफ लिव्हिंगसाठी काम झाले पाहिजे. त्यासाठी पिण्याचे पाणी, हवेची गुणवत्ता, सायबर सुरक्षा यासह अनेक अशा क्षेत्रांमध्ये जिथे सुधारणा केली जाऊ शकते, अशासाठी देशातील तरुणांनी पुढे आले पाहिजे, असे मोदींनी सांगितले. 

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीPunjabपंजाब