शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

चंद्राबाबूंनी स्वतःच्या सासऱ्याच्या पाठीत खंजीर खुपसला- नरेंद्र मोदी

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 10, 2019 13:30 IST

पंतप्रधान मोदी यांनी आंध्र प्रदेशमध्ये जाऊन चंद्राबाबू नायडूंवर जोरदार हल्लाबोल केला आहे.

अमरावती: लोकसभा निवडणूक 2019चे मिशन डोळ्यांसमोर ठेवून पंतप्रधान नरेंद्र मोदी वेगवेगळ्या राज्यांमध्ये जाऊन जनसभांना संबोधित करत आहेत. पंतप्रधान मोदी यांनी आंध्र प्रदेशमध्ये जाऊन चंद्राबाबू नायडूंवर जोरदार हल्लाबोल केला आहे. त्यामुळे दक्षिणेकडील राजकीय वातावरण तापले आहे. यावेळी चंद्राबाबूंनी सासऱ्याच्या पाठीत खंजीर खुपल्याची टीका मोदींनी केली आहे. चंद्राबाबूंनी स्वतःच्या सासऱ्यांच्या पाठीत खंजीर खुपसला आहे. ते उद्या दिल्लीत फोटो काढण्यासाठी जात आहे. परंतु भाजपा आपल्या कार्यकर्त्यांच्या पैशानं कार्यक्रम करते, तर हे आंध्रच्या जनतेच्या तिजोरीतून पैसे काढून कार्यक्रम करत आहेत, असंही मोदी म्हणाले आहेत. ते गुंटूरमधल्या जनसभेला संबोधित करताना बोलत होते.2014ला आमचं सरकार आलं तेव्हा आम्ही आंध्र प्रदेशसाठी विशेष पॅकेज दिलं. 2016मध्ये ते पॅकेज लागूही करण्यात आलं. त्यामुळे आंध्र प्रदेशला विशेष राज्यासारखीच मदत मिळाली. आंध्राच्या मुख्यमंत्र्यांनी या गोष्ट स्वीकारून केंद्राचे आभार मानले होते. परंतु केंद्रानं दिलेल्या पॅकेजचा आंध्र सरकारनं योग्य वापर केला नाही. राज्याचा विकास करण्यात अपयशी ठरलेल्या टीडीपीनं नंतर यू-टर्न घेतला, असा हल्लाबोल मोदींनी केला आहे. आमचा उद्देश स्वतःसाठी नव्हे, तर देशासाठी धन निर्माण करण्याचा आहे.दिल्लीतल्या नावाजलेल्या कुटुंबीयांनी अहंकारात नेहमीच आंध्र प्रदेशातील नेत्यांचा अपमान केला आहे. त्यामुळेच एनटी रामाराव यांनी तेलुगू देसम पक्षाची स्थापना केली. टीडीपी नेत्यांनी काँग्रेसमुक्त भारतासाठी काम केलं पाहिजे, तेच आता काँग्रेस पक्षाला पाठिंबा देण्याचं काम करत आहेत. तुमच्या चौकीदारानं यांची झोप उडवली आहे. एक एक पैशाचा हिशेब द्यावा लागल्यावर मुख्यमंत्र्यांची झोप उडाली. आंध्राच्या लोकांनी आता तरी जागे व्हा, अशी टीकाही मोदींनी केली आहे. 

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीAndhra Pradeshआंध्र प्रदेश