सेंट्रल हॉलमध्ये सौहार्दपूर्ण वातावरण : मोदी, राहुल यांच्या एकमेकांना शुभेच्छा

By Admin | Updated: June 10, 2014 00:29 IST2014-06-10T00:29:26+5:302014-06-10T00:29:26+5:30

संसदेच्या सेंट्रल हॉलमध्ये आज अत्यंत खेळीमेळीचे आणि सौहार्दपूर्ण दृश्य होते.

Moderate atmosphere in Central Hall: Modi and Rahul greet each other | सेंट्रल हॉलमध्ये सौहार्दपूर्ण वातावरण : मोदी, राहुल यांच्या एकमेकांना शुभेच्छा

सेंट्रल हॉलमध्ये सौहार्दपूर्ण वातावरण : मोदी, राहुल यांच्या एकमेकांना शुभेच्छा

>नवी दिल्ली : संसदेच्या सेंट्रल हॉलमध्ये आज अत्यंत खेळीमेळीचे आणि सौहार्दपूर्ण दृश्य होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मोठय़ा उत्साहात आपले राजकीय विरोधक राहुल गांधी यांचा हात हातात धरून स्वागत केले. तर काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी अधूनमधून भाजपाचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण आडवाणी यांच्याशी गप्पा मारीत होत्या. प्रसंग होता लोकसभा आणि राज्यसभेच्या संयुक्त सभागृहातील राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्या अभिभाषणाचा. 
यावेळी राजकीय विरोधक असलेले डावे, उजवे एकमेकांना शुभेच्छा देत असल्याचे दिसून आले. यामध्ये सर्वात लक्षवेधी ठरले ते पंतप्रधान मोदी आणि काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी. पंतप्रधानांनी उत्साहात राहुल गांधी यांचा हात धरल्याचे दिसून येत होते. 
काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी पक्षातील वरिष्ठ नेते मोतीलाल व्होरा आणि जयराम रमेश यांच्यासोबत आठव्या रांगेत बसले होते. पंतप्रधान मोदी राहुल गांधी यांच्याजवळ आले आणि त्यांचा हात धरला. तेव्हा राहुल गांधींच्या चेह:यावर हास्य उमटले. त्यानंतर लगेच विविध पक्षांचे नेते राहुल गांधी यांच्या सभोवताल जमा झाले. लोकसभेत एकमेकांविरुद्ध टीका केल्यापासून पहिल्यांदाच पंतप्रधान मोदी यांनी अशाप्रकारे राहुल गांधी यांना शुभेच्छा दिल्या असाव्यात. राष्ट्रपतींच्या अभिभाषणापूर्वी सोनिया गांधी आणि भाजपा नेते लालकृष्ण आडवाणी यांची चर्चा सुरू होती. (लोकमत न्यूज नेटवर्क)
 
-संसदेच्या संयुक्त अधिवेशनात सोमवारी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी केलेल्या 55 मिनिटांच्या इंग्रजीतील अभिभाषणावर हिंदीतील घोषणा, आकर्षक वाक्प्रचार आणि अनुप्रास, अलंकारांसोबतच पंतप्रधान नरेंद्र मोदींची छाप स्पष्टपणो दिसून आली. राष्ट्रपतींच्या अभिभाषणात ‘डी’ आणि ‘टी’ या अक्षरांपासून प्रारंभ होणा:या अनुप्रासांचाही मोठय़ा प्रमाणात समावेश होता. देश बलवान बनविण्यासाठी ट्रॅडिशन, टॅलेंट, टुरिझम, ट्रेड आणि टेक्नॉलॉजी या 5 टींची गरज आहे, असे राष्ट्रपती म्हणाले. त्यासोबतच त्यांनी डेमोक्रसी, डेमोग्राफी आणि डिमांड या 3 टींचाही आवजरून उल्लेख केला.

Web Title: Moderate atmosphere in Central Hall: Modi and Rahul greet each other

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.