मॉडेल पुजा मिश्राचा मॉबाईल दुकानात धिंगाणा

By Admin | Updated: October 13, 2015 15:10 IST2015-10-13T15:10:02+5:302015-10-13T15:10:11+5:30

मॉडेल आणि अभिनेत्री पुजा मिश्रा पुन्हा एकदा वादाच्या भोव-यात अडकली असून आता पुजाने दिल्लीतील एका मोबाईलच्या दुकानात धिंगाणा घातला आहे.

Model Pooja Mishra's mobile phone racket | मॉडेल पुजा मिश्राचा मॉबाईल दुकानात धिंगाणा

मॉडेल पुजा मिश्राचा मॉबाईल दुकानात धिंगाणा

ऑनलाइन लोकमत 

नवी दिल्ली, दि. १३ - मॉडेल आणि अभिनेत्री पुजा मिश्रा पुन्हा एकदा वादाच्या भोव-यात अडकली असून आता पुजाने दिल्लीतील एका मोबाईलच्या दुकानात धिंगाणा घातला आहे. संतापाच्या भरात पुजाने दुकानातील कर्मचा-यांना मारहाण केली व तसेच कर्मचा-यांना बंदुकीचा धाक दाखवत ठार मारण्याची धमकी दिली आहे. 
बिग बॉस या शोमुळे चर्चेत आलेली पुजा मिश्रा दिल्लीतील करोलबाग येथील एका ख्यातनाम मोबाईलच्या दुकानात गेली होती. या दुकानात पुजाने धिंगाणा घातला असून हा सर्व प्रकार कॅमे-यात कैद झाला आहे. एका ग्राहकासोबत पुजाचा वाद झाला व यानंतर संतापलेल्या पुजाने संबंधीत ग्राहक आणि दुकानातील कर्मचा-यांना मारहाण केली.  या व्हिडीओत पुजा कर्मचा-यांना शिवीगाळ करतानाही दिसत आहे. वादाचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. 

Web Title: Model Pooja Mishra's mobile phone racket

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.