गोलाणीत मोबाईल दुकानदाराला मारहाण

By Admin | Updated: July 14, 2016 21:35 IST2016-07-14T21:35:21+5:302016-07-14T21:35:21+5:30

जळगाव: दुरुस्तीला टाकलेल्या मोबाईलच्या कारणावरुन गुरुवारी दुपारी एक वाजता गोलाणी मार्केटमध्ये राजू वाधवानी या दुकानदाराला चौघांनी मारहाण केल्याची घटना घडली. गेल्या महिन्यात झालेल्या दंगलीमुळे गोलाणी मार्केटमध्ये दुकानदारांमध्ये आधीच भीतीचे वातावरण आहे, त्यात पुन्हा दुकानदार व ग्राहक यांच्यात वाद झाल्याने पळापळ झाली होती.

Mobilized mobile shopkeeper assault | गोलाणीत मोबाईल दुकानदाराला मारहाण

गोलाणीत मोबाईल दुकानदाराला मारहाण

गाव: दुरुस्तीला टाकलेल्या मोबाईलच्या कारणावरुन गुरुवारी दुपारी एक वाजता गोलाणी मार्केटमध्ये राजू वाधवानी या दुकानदाराला चौघांनी मारहाण केल्याची घटना घडली. गेल्या महिन्यात झालेल्या दंगलीमुळे गोलाणी मार्केटमध्ये दुकानदारांमध्ये आधीच भीतीचे वातावरण आहे, त्यात पुन्हा दुकानदार व ग्राहक यांच्यात वाद झाल्याने पळापळ झाली होती.
गोलाणी मार्केटमध्ये पहिल्या मजल्यावरील सी विंगमध्ये राजू वाधवानी याचे सतनाम मोबाईल नावाचे दुकान आहे. तेथे दुपारी एक वाजता त्यांच्या दुकानात चार जण आले व माझ्या वडिलांनी आठ महिन्यापासून मोबाईल दुरुस्तीला टाकला आहे, असे सांगितले, त्यावर वाधवानी यांनी कोणता मोबाईल, कोणी व केव्हा आणला अशी विचारणा केली असता या चौघांनी शिवागाळ करत वाधवानी यांना मारहाण करायला सुरुवात केली. या प्रकारामुळे परिसरात घबराटीचे वातावरण पसरुन लगेच पळापळ झाली. वाधवानी यांच्या मदतीला शेजारचे दुकानदार धाऊन आल्याने या चौघांनी तेथे धूम ठोकली. त्यामुळे मारहाण करणार्‍यांची नाव समजू शकली नाहीत.

Web Title: Mobilized mobile shopkeeper assault