शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

मोबाइल चोरी गेला? तत्काळ उचला ही पावले

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 25, 2023 08:20 IST

काही गोष्टींबाबत सावधगिरी बाळगण्याची गरज आहे. 

नवी दिल्ली : इंटरनेट-स्मार्टफोनचा वापरामुळे ऑनलाइन खरेदीचे प्रमाण देशात मोठ्या प्रमाणात वाढले आहे. यूपीआय व्यवहारांनी आतापर्यंत अनेक विक्रम मोडीत काढले आहेत. परंतु याचबरोबर सायबर गुन्हेगारांकडून होणाऱ्या आर्थिक लुबाडणुकीच्या घटनाही वाढत आहेत. अशात चोरट्याने तुमचा स्मार्टफोन लांबवल्यास त्यातील माहितीचा वापर करून तुमचे बँक खाते साफ केली जाण्याची भीती असते. त्यामुळे ग्राहकांना अधिक सतर्क राहण्याची गरज आहे. काही गोष्टींबाबत सावधगिरी बाळगण्याची गरज आहे. 

पासवर्ड कधीही सेव्ह करू नकास्मार्टफोनमध्ये युजर्सची खासगी माहिती आणि व्यवहारांची नोंद असते. चोराकडून बँक खाते साफ केले जाऊ नये यासाठी पासवर्ड कुठेही सेव्ह करू नये, ही बाब लक्षात ठेवा. तुमची आर्थिक माहिती असलेल्या सर्व प्रकारच्या ॲप पासवर्ड लॉक करा. आपले नेट बँकिग पासवर्ड मोबाइल तसेच गुगल अकाऊंटवर कधीही सेव्ह करू नका.

पासवर्ड सुरक्षेची खबरदारी घ्याआर्थिक व्यवहारांसाठी वापरल्या जाणाऱ्या ॲप्सवर पासवर्डच्या माध्यमातून दुहेरी सुरक्षा द्या. मोबाइल पासवर्ड  असल्याने कोणत्याही अनोळखी व्यक्तीला तो चालू करणे शक्य होत नाही. तसेच पासवर्ड असल्याने अॅपचाही वापर करणे शक्य होत नाही. 

अधिक ॲप्सचा वापर टाळा युजर्स अनेक प्रकारच्या अॅप्सचा वापर करतात. परंतु हे चुकीचे आहे. यामुळे मोबाइलमध्ये छेडछाडीच्या शक्यता वाढतात. व्यवहारांसाठी एक ॲप पुरेशी असते. वरवरचा खर्च, अचानकच्या खर्चासाठी मोबाइल वॉलेटमध्ये काही पैसे ठेवणे चांगले ठरते.

यूपीआय तातडीने ब्लॉक कराचोरट्याने मोबाइल लांबवल्यास कस्टमर केअरवर फोन करून बँक खाते व यूपीआय ब्लॉक करा. यासाठी उशीर लावू नका. अन्य मोबाइलवरहूनही तुम्हाला हे काम करणे शक्य असते.

सुरक्षित ॲप्सचा वापर करासध्या युजर्ससाठी अनेक प्रकारच्या यूपीआय ॲप उपलब्ध आहेत. सुरक्षेच्या तक्रारींवरून आरबीआय सातत्याने सदोष ॲपवर कारवाई करीत असते. त्यामुळे सुरक्षेच्या दृष्टीने सर्वोत्तम ॲपचा वापर करा. सुरक्षेबाबत सर्व फिचर्सची पडताळणी करून अपची निवड करा.

 

 

टॅग्स :MobileमोबाइलThiefचोर