धावत्या गाडीतून मोबाईल पळविले

By Admin | Updated: March 25, 2015 21:10 IST2015-03-25T21:10:01+5:302015-03-25T21:10:01+5:30

धावत्या गाडीतून मोबाईल पळविले

Mobile ran through a moving car | धावत्या गाडीतून मोबाईल पळविले

धावत्या गाडीतून मोबाईल पळविले

वत्या गाडीतून मोबाईल पळविले
दोन प्रवाशांना फटका : नागपूर रेल्वेस्थानकावर चोरटे सक्रिय
नागपूर : नागपूर रेल्वेस्थानकावरून गाडी सुटल्यानंतर धावत्या गाडीतून दोन प्रवाशांचे महागडे मोबाईल पळविल्याप्रकरणी लोहमार्ग पोलिसांनी अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
अमोल बावनकर (२६) रा. मौदा जि. नागपूर हे २३ मार्चला रेल्वेगाडी क्रमांक १२१३६ नागपूर-पुणे एक्स्प्रेसने प्रवास करीत होते. त्यांनी एस ५ कोचमध्ये आपला सॅमसंग गॅलेक्झी हा २४ हजार ३५० रुपये किमतीचा मोबाईल चार्जिंगला लावला. ते कोचच्या दारावर उभे असताना अज्ञात आरोपीने नागपूर रेल्वेस्थानकावरून गाडी सुटल्यानंतर त्यांचा मोबाईल पळविला. मोबाईल चोरीला गेल्याचे समजल्यानंतर त्यांनी याबाबत लोहमार्ग पोलिसात तक्रार नोंदविली. दुसऱ्या घटनेत आशिषकुमार मनोहरलाल भट (३७) रा. काटोल रोड, नागपूर हे रेल्वेगाडी क्रमांक १२१६० अमरावती-जबलपूर एक्स्प्रेसच्या जनरल कोचने प्रवास करीत होते. नागपूर रेल्वेस्थानकावरून गाडी सुटल्यानंतर अज्ञात आरोपीने त्यांचा एचटीसी कंपनीचा ७ हजार रुपये किमतीचा मोबाईल पळविला. मोबाईल चोरीला गेल्याचे समजल्यानंतर त्यांनी लोहमार्ग पोलीस ठाणे गाठून अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. नागपूर रेल्वेस्थानकावर चोरट्यांची टोळी सक्रिय झाली असून प्रवाशांचे महागडे साहित्य, मोबाईल, पाकीट पळविण्याच्या घटना वाढत आहेत. (प्रतिनिधी)
................

Web Title: Mobile ran through a moving car

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.